बॉलिवूडमुळेच पाकिस्तानातील ‘लैंगिक’ गुन्ह्यात वाढ, इम्रान खानचं ‘वादग्रस्त’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या बिनबुडाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी बॉलिवूड आणि त्यातील सिनेमे जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान आणि माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

इम्रान खान यांनी देशातील वाढत्या लैंगिक हिंसाचाराला हॉलिवूड जबाबदार आहे असंही म्हटलं आहे. इम्रान खान म्हणाले, “देशात इंटरनेटद्वारे बॉलिवूड आणि हॉलिवूडचा कंटेट येतो. यामुळे अनेक देशातील लोक बिघडत आहेत. मोबाईलवर मुलांना घाणरेडा कंटेट मिळतो. यामुळे पाकिस्तानात बाल लैंगिक अत्याचारही वाढताना दिसत आहेत.”

इम्रान खान पुढे म्हणाले, “अमेरिका आणि भारतीय फिल्म इंडस्ट्रीतून येणारा कंटेट मुलं आणि लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करत आहे. यामुळे लोकांची घर मोडताना दिसत आहेत. आपण पश्चात्य सभ्यतेच्या खूप हानिकारक गोष्टीचं सेवन करत आहोत.”

इम्रान खान यांनी आधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. पुन्हा एकदा त्यांनी जे विधान केलं आहे ते तर अशावेळी केलं जेव्हा त्यांच्या सरकारनं भारतीय सिनेमांना पाकिस्तानात बॅन केलं आहे. गेल्या अनके वर्षांमध्ये बॉलिवूडमधील मुल्क, राजी, नाम शबाना, फँटम आणि बेबी असे सिनेमे पाकिस्तानात रिलीज झालेले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा –