Nagar News : विवाहित तरुण-तरुणीची रेल्वेखाली आत्महत्या

श्रीगोंदा/अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – येळपणे येथील एका विवाहित तरुण तरुणीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे त्यांचे नावे आहेत. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राजू व राणी दोघे विवाहीत असून, ते दोघेही सोमवारी सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडले. याबाबत कुटुंबातील सदस्यांनी बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद केली. तेव्हा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली त्या दोघांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी त्या दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या दोघांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून,मात्र पोलिसांच्या माहितीनुसार ही आत्महत्या प्रेमसंबंधातून झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.