शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर ‘अर्धनग्न’ व ‘बोंबाबोंब’ आंदोलन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत व महसूल विभागामध्ये शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असून याच्या निषेधार्थ आज पारधी समाजाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

शिरूर तहसील कार्यालय समोर मांडवगण फराटा ता. शिरूर येथील हिरालाल रामा भोसले परिवारासह गेल्या अकरा दिवसांपासून विविध मागण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. घोटाळा करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

या ठिय्या आंदोलनास आज पारधी समाजाच्या वतीने मोर्चा बोंबाबोंब, अर्धनग्न आंदोलन करून पाठिंबा दिला. मांडवगण फराटा येथे दारिद्र खालील यादीमध्ये धनदांडग्या लोकांना समाविष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. तर असे पन्नास कुटुंब आहे ज्यांची दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये समाविष्ट करावे, मांडवगण फराटा ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, अपंगांच्या योजना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे.

मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका यांनी आपली नावे दारिद्र्यरेषेचे मध्ये समाविष्ट केली व घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे यांनी विविध योजनांमध्ये शासनाची फसवणूक केल्याने या प्रकरणाची चौकशी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद शाळा व पी डब्ल्यू हद्दीत टपऱ्या व गाड्यांच्या नोंदी रद्द करून अतिक्रमणे हटवणे, मांडवगण फराटा येथील कोतवाल यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण गायरान हद्दीतील बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावे, वन फराटा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि बेकायदेशीर ग्रामपंचायतसदस्य याचे अतिक्रमण केले असून त्यांचे निलंबन करणे, येथे अपंग नागरिकांनासवलतीत ग्रामपंचायत मध्ये गाळे देणे, मांडव वन फराटा येथील हिंदू पारधी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी शासकीय खाजगी येथे पैशाची मागणी करत आहेत्यांची चौकशी करणे, मांडवगण फराटा येथील पासे पारधी समाजातीललोकांना रेशनिंग कार्ड मिळावे, मांडवगण फराटा येथे सुरू असलेले अनधिकृत अवैद्य धंदे मटका, सिनेम ग्रह, कॉम्प्युटर लॉटरी, धाब्यावर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्री, बंद करावी.

अशा एकूण ४० मागण्यासाठी केली ११ दिवसापासून हिरालाल रामा भोसले यांनी करून तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असे त्यांनी सांगितले.

शिरुड शहरातील इंदिरा गांधी पुतळा यांना पुष्पहार घालून पारधी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला मोर्चा शिरूर तहसीलदार कार्यालय गेल्यावर हे पारधी समाजातील पुरुष नागरिकांनी अर्धनग्न होऊन आंदोलन करून पारधी समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलनही केले शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आली. लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली.

सिनेजगत बातम्या

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’