पिंपरी पोलिस ठाण्यासमोर वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी पोलिस ठाण्याच्या समोर हाकेच्या अंतरावर असलेल्या दवा बाजार मध्ये भरदिवसा उभे असलेल्या तीन वाहनांच्या काचा सराईत गुन्हेगारांनी फोडल्या. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन जणांच्या टोळक्याने दवा बाजारातील वाहनांची तोडफोड केली. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते. विशेष म्हणजे पिंपरी पोलीस ठाण्याच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोर काही हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6f99c02-8a92-11e8-b6a9-9ff36e2e3f94′]

शहरात वारंवार तोडफो़डीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी दोन वेळा ऑपरेशन ऑलआऊट राबवले. सुमारे पाचशे गुन्हेगारांवर याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम शून्य असल्याचे आजच्या घटनेवरुन पहायला मिळाले.

आज चक्क पोलिस ठाण्याच्या समोर भरदिवसा तेहि सराईत गुन्हेगाराच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावरून पोलिसांची वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.