हिंजवडीत आंबे विक्रेत्याला कोयत्याच्या धाकाने लुटले

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी-वाकड रोडवर आंबे विकणा-या विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. आंबा खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखून २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

फिटु शेख (वय-३० रा. हिंजवडी-वाकड रोड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटु शेख यांचा हिंजवडी-वाकड रोडवरील पुजा फर्नीचरच्या बाजुला आंबा विक्रीचे दुकान आहे. आंबे खऱेदी करण्याच्या बहाण्याने तीन इसम दुकानात आले. त्यांनी फिटु शेख यांना कोयत्याचा धाक दाखवून आंबे विक्री करुन जमा झालेले १५ हजार रुपये आणि मोबाईल असा एकूण २२ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.जे. धामणे तपास करीत आहेत.