ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ‘बदलाचे वारे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडत आहे. मोबाईल जसे बदलले जातात, तशीच स्थिती वाहनउद्योगात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत वाहनांच्या अनेक श्रेणी बाजारात दाखल होत आहे. आपण पाहूया आता कोण-कोणत्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची वाहने आता रस्त्यावर येणार आहेत आणि काय त्यात बदल असणार आहेत.

क्रॉसओव्हर मायक्रो एसयूवी: यावर्षी लाँच होणारी मारूती सुझुकीची नवीन कार मायक्रो कार २०१८ मध्ये सुरू झालेल्या फ्यूचर एस संकल्पनेवर आधारीत आहे. ही नवीन कार सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीच्या आसपास बाजारात आणली जाईल. ही कार फक्त पेट्रोल इंजिनावर असणार आहे.

सात आसनी वॅगनआर: मारुती सुझुकीची यावर्षी लाँच होणारी दुसरी कार ‘वॅगनआर’ ही सात आसनी असणार आहे. मारुतीचे प्रीमियम आउटलेट नेक्साकडून या कारची विक्री होऊ शकते. या सात आसनी कारमध्ये ५+२ अशी सीटिंग लेआउट आहे. सात आसनी वॅगनआरमध्ये १.२ लिटर चे सीरिज इंजिन असू शकते.

विटारा ब्रेझा: विटारा ब्रेजा ही कार लाँच होणार आहे. पेट्रोल इंजिनवर आधारीत ब्रेझा कारची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. १.५ लिटर के-सीरिज पेट्रोल इंजिन असेल. ज्यामुळे १०४ बीएचपी ऊर्जा आणि 138 एनएम पीक टॉर्क निर्माण होईल. हे इंजिन सुझुकीच्या हायब्रिड सिस्टीमसह येणार आहे. ज्यामुळे ही कार चांगले मायलेज देईल.

अर्टिगा स्पोर्ट:मारुती सुझुकीची यावर्षी लोकप्रिय असलेली आर्टिगाची आता लक्झरी व्हर्जन येणार आहे. ही कार आर्टिगा स्पोर्ट या नावाने लाँच केली जाईल. ही कार सहा आसनी एमपीव्ही असून ही कार २+२+२ या सीटिंग लेआउटसह येणार आहे. हे टॉप मॉडेल असणार आहे. कंपनी या कारची विक्री प्रीमियम आउटलेट नेक्समधून करणार आहे.