बायको समजून दीराने केला वहिनीचा खून

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन

पत्नीचे भावासोबत अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन बायकोचा खून करण्या ऐवजी वहिनीचा खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. महादेव विष्णू थिटे असे या आरोपीचे नाव असून ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्याला आज न्यायालयात हजर केले असता ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d762677-cbe6-11e8-aaba-bf66ac0b01d9′]

यापूर्वी संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेला मयताचा मुलगा संतोष थिटे याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिली आहे.

आरोपी महादेव थिटे हा शहाजी थिटे यांचा भाऊ तर मयत मंगल थिटे यांचा दीर आहे. त्याने १ आॅक्टोबर रोजी मंगल थिटे यांचा धारदार शस्त्राने खून केला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. महादेवला अटक केल्यानंतर लपवून ठेवलेली कुऱ्हाड व कपडे मिळाले. महादेवची पत्नी सीताबाई व मयताचा पती शहाजी यांचे अनैतिक संबंध असावे, असा महादेवला संशय होता.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4738792b-cbe6-11e8-a7ee-fd2b6e1f2e00′]

यावरुन त्याचे व सीताबाईचे वारंवार भांडण होत होते. त्या भांडणातून सीताबाई माहेरी निघून गेली होती. तिला कायमची संपवायची असा विचार करुन महादेव कुऱ्हाड घेऊन फिरत होता. १ आॅक्टोबर रोजी महादेव शहाजीच्या घरी आला व बाहेर झोपलेली मंगल थिटे यांना आपली पत्नी सीताबाई आहे, असे समजून वार केले, अशी कबुली महादेवने दिली. यातच मंगल थिटे जागेवर गतप्राण झाल्या़ याबाबत अधिक तपास सुरू आहे. पोनि विश्वंभर गोल्डे, सपोनि प्रमोद सुर्वे, सुयोग वायकर, पोना विकी घाडगे, समीर पठाण, अमोल बकाल, राहुल रूपनवर, स्वप्निल गायकवाड, अभिजित मोहोळकर या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला.