विट्यात अतिरिक्त जिल्हा सत्र आणि दिवाणी न्यायालय मंजूर

विटा : पोलीसनामा ऑनलाइन

ता.27 : विटा (ता.खानापूर) येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर झाले आहे. अशी माहिती विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय देसाई यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eeae9c93-c26b-11e8-b349-ed4207afe80c’]

देसाई म्हणाले, या न्यायालयामुळे खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस तालुक्यातील नागरिकांची न्यायालयीन कामकाजाची सोय होणार आहे. विट्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होती. आमदार अनिल बाबर व अॅड.विनोद गोसावी यांनीही पत्र दिले होते. सध्या असलेल्या विटा येथील न्यायालयीन इमारतीत वरिष्ठ न्यायालय सुरु होणार आहे. तर वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी पालिकेने कराड रस्त्यालगत पेट्रोल पंपामागे कासारबुवा मंदिराजवळ तीस गुंठे जागा दिली आहे. यासाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. नवीन न्यायालय सुरू झाल्यानंतर खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस तालुक्यातील नागरिकांचा सांगलीला जाण्याचा त्रास वाचणार आहे. यावेळी अॅड. विनोद गोसावी, विशाल कुंभार, शौर्या पवार, निशा मार्ले, बबनराव कदम, अभिजित मार्ले, सचिन जाधव, विजय जाधव, संतोष जाधव, यू. व्ही. यादव, व्ही. एस. जाधव, बी. एम. महाडीक, बी. व्ही. म्हेत्रे, एस. एस. गायकवाड, ए. बी. गायकवाड, डी. बी. शितोळे, पी.एस.बागल, महेश शानभाग, प्रमोद देशमुख उपस्थित होते.