Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – income tax|प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) दैनिक भास्कर ग्रुप (Dainik Bhaskar Group) च्या देशभरातील अनेक कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर संसदेसह देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. आता देशातील मोठी मीडिया संस्था दैनिक भास्करबाबत प्राप्तीकर विभागाने मोठा दावा केला आहे. छापेमारीच्या एक दिवसानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (आयटीडी) ने एक वक्तव्य जारी केले आहे की दैनिक भास्कर ग्रुपने 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची चोरी (evaded tax worth Rs 700 crore) केली आहे. 22 जुलैरोजी प्राप्तीकर विभागाने दैनिक भास्कर आणि भारत समाचारचे प्रमोटर्सचे घर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापा (raided) मारला होता.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील भायावह स्थिती ठळकपणे मांडून दैनिक भास्कर ग्रुपने सरकारला अडचणीत आणल्यानेच ही कारवाई केली गेली असा आरोप विरोधी पक्षांसह देशभरातून विविध स्तरातून करण्यात येत होता. दरम्यान आता प्राप्तीकर विभागाने 700 कोटी टॅक्स चोरीचा दावा केला आहे. या संदर्भात आयटी विभागाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, त्यांनी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त केली आहे. सोबतच 200 कोटी रुपयांच्या बेहिशोबी व्यवहारांचा शोध घेतला आहे.

प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे की, मीडिया हाऊसने खाण, प्रक्रिया आणि मद्य, आटा व्यवसाय, अचल संपत्तीची विक्रीच्या माध्यमातून 90 कोटी रुपयांचे मोठे उत्पन्न मिळवले. डीबी ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी बनावट खर्च बुक केले आहे आणि नोंदणीकृत कंपन्यांच्या नफ्यातून 700 कोटीच्या रक्कमेची चोरी केली आहे.

आयटी विभागाचे म्हणणे आहे की, मीडिया हाऊसमध्ये होल्डिंग आणि सहायक कंपन्यांसह 100 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. चौकशीत आयटी विभागाला आढळले की, मीडिया हाऊस आपल्या कर्मचार्‍यांच्या नावावर अनेक कंपन्यांचे संचालन करत आहे, ज्यांचा वापर बनावट खर्चाची बुकिंग आणि फंडच्या रूटिंगसाठी केला आहे.

आयटी विभागाने हे सुद्धा म्हटले की,
या कंपन्यांचा वापर बनावट खर्चाची बुकिंग आणि नोंदणीबद्ध कंपन्यांच्या नफ्यात हेराफेरी सारख्या अनेक उद्देशासाठी करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार प्राप्तीकर विभागाला नोंदणीकृत कंपन्यांसाठी शेयर सेबीद्वारे निर्धारित नियमांचे उल्लंघन केल्याचे सुद्धा आढळले आहे.
कंपनीच्या विरूद्ध बेनामी व्यवहार निषेध कायद्याबाबत सुद्धा चौकशी केली जाईल.

Web Title : income tax department claims dainik bhaskar group evaded tax worth rs 700 crore

Aloe Vera farming | 50,000 रूपयात सुरू करा आपला स्वत:चा बिजनेस,
5 लाखापर्यंत होईल मोठा नफा; जाणून घ्या काय करावे लागेल?

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल,
जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्य