31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी केली माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : Income Tax Return | चालू महिन्याची शेवटची तारीख म्हणजे 31 डिसेंबर प्राप्तीकर रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तीकर रिटर्न दाखल (Income Tax Filing) करणार्‍या लोकांना या तारखेपूर्वी आपला प्राप्तीकर रिटर्न जमा करणे आवश्यक आहे. प्राप्तीकर विभागाने, आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत एक ट्विट सुद्धा लिहिले आहे. (Income Tax Return)

 

 

 

 

प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) करदात्यांना आपल्या एका ट्विटमध्ये माहिती देताना लिहिले की, कृपया आपल्या कर्मचार्‍यांना मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आपला इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची आठवण करा.

 

मूल्यांकन वर्ष वर्ष 2021-22 साठी आयटीआर सादर करण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना आठवण करून देतो की,  कृपया शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. कृपया http://incometax.gov.in वर व्हिजिट करा.

 

अनेकदा प्राप्तीकर रिटर्न जमा करणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. प्राप्तीकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन सहजपणे आपला प्राप्तीकर रिटर्न फाईल करू शकता. (Income Tax Return)

 

प्राप्तीकर रिटर्न जमा करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

– ऑनलाइन पद्धतीने प्राप्तीकर रिटर्न फाइल करण्यासाठी सर्वप्रथम प्राप्तीकरचे ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर व्हिजिट करा.

– यानंतर पोर्टलवर लॉगइन बटनवर क्लिक करा.

– यानंतर यूजरनेम नोंदवून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

– पासवर्ड नोंदवा.

– यानंतर ई-फाईलच्या टॅबवर क्लिक करून फाईल इन्कम टॅक्स रिटर्नच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता असेसमेंट ईयरचा पर्याय निवडून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा ऑपशन येईल.

– ऑनलाइन ऑपशनवर क्लिक करून पुढे जा.

– या स्टेपनंतर दिलेले ऑपशन – इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) किंवा ऑदर्स पैकी इंडिव्हिज्युअल पर्याय निवडा.

– यानंतर कंटिन्यू टॅबवर क्लिक करा.

– या स्टेपनंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 पर्यायाची निवड करून प्रोसीडच्या पर्यायावर टॅबवर क्लिक करावे लागेल.

– यानंतर पुढील स्टेपमध्ये मूलभूत सूट मर्यादेच्या वर किंवा कलम 139 (1) अंतर्गत सातव्या तरतुदीमुळे आपला रिटर्न दाखल करण्याचे कारण विचारले जाईल.

– तुम्हाला हे ठरवावे लागेल की, ऑनलाइन आयटीआर दाखल करताना योग्य पर्याय निवडला आहे.

– या स्टेपनंतर बँक डिटेल नोंदवा.

– यानंतर तुमच्या समोर आयटीआर फाईल करण्यासाठी नवीन पेज उघडून समोर येईल.

– यानंतर तुम्हाला तुमचे आयटीआर व्हेरिफाय करून याची एक हार्डकॉपी प्राप्तीकर विभागाला पाठवावी लागेल.

 

Web Title :- Income Tax Return | submit your income tax return before 31st december information given by income tax department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा