Income tax : पगारात कपात होणार, परत मिळविण्यासाठी उरला फक्त ‘हा’ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019-20 या आर्थिक वर्षाचा दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या काळात आपल्याला आपल्या वर्षभराचा हिशेब कंपनीला द्यावा लागतो. कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांकडून इन्वेस्टमेंट डिक्लेरेशनची मागणी करतात. यासाठी कंपनीने डेडलाईन देखील निश्चित केली आहे. या अंतिम मुदतीपर्यंत कंपनीला इन्वेस्टमेंट डिक्लेरेशनची सादर करावा लागतो. त्यामुळे जर आपण मुदतीच्या तारखेपर्यंत गुंतवणूकीचा पुरावा दिला नाही तर आपला पगार कमी केला जातो. दरम्यान, ज्या लोकांच इन्वेस्टमेंट डिक्लेरेशनची देण्यास राहून गेलं आहे, त्यांच्याकडेही पर्याय उपलब्ध आहे? चला जाणून घेऊया…

जर उत्पन्न करपात्र असेल आणि गुंतवणूकीचा कोणताही पुरावा दिलेला नसेल, तर येत्या महिन्यात तुमच्या पगारात घसरण होईल. वास्तविक, प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 192 च्या अंतर्गत आपली कंपनी टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस) वजा करण्यास जबाबदार आहे. जर तुमच्या पगारातून टीडीएस वजा केला असेल तर तुम्ही आयकर विवरणपत्रात गुंतवणूक, खर्च आणि इतर सूट याबद्दल माहिती देऊन वजा केलेली रक्कम परत मिळवू शकता.

सर्वसाधारणपणे आयकर विवरणपत्र भरणे जूननंतर सुरू होते आणि अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असते. दरम्यान, जवळजवळ प्रत्येक वर्षी हा कालावधी एक महिन्यापर्यंत वाढविला जातो. दरम्यान, टीडीएस कपातीची माहिती मिळविण्यासाठी आपल्याला पगाराची स्लिप तपासावी लागेल. यासह, प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन आपण फॉर्म 26 एएस वरून कर कपातीची माहिती देखील मिळवू शकता.