IND vs AUS | कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळवला जात आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आता विराट कोहलीने त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. (IND vs AUS)

विराटच्या नावावर अनोखं शतक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 इनिंग खेळणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या अगोदर केवळ सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 इनिंग खेळला आहे.विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 41 इनिंग तर टी20 सामन्यात 21 इनिंग खेळला आहे. (IND vs AUS)

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक इनिंग
भारताचा महान फलंदाज मास्टर – ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 इनिंग खेळला आहे. यामध्ये सचिनने 49.68 च्या रनरेटने 6707 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीने 100 इनिंगमध्ये 51 च्या रनरेटने 4500 धावा केल्या आहेत.

दिल्ली टेस्टमध्ये विराटच्या विकेटवरुन वाद
आजच्या सामन्यात विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ असतानाच बाद झाला.
त्याला पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमनने पायचित केलं. या विकेटवरून आता वाद निर्माण झाला आहे.
पंच नितिन मेनन यांच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त करताना नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नितिन मेनन यांनी बाद ठरवताच कोहलीने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचांनीसुद्धा मैदानी पंचांचा निर्णय
योग्य मानत विराटला बाद ठरवलं.
यात अल्ट्रा एजमध्ये चेंडू आधी पॅडला लागला की बॅटला हे स्पष्ट दिसत नव्हतं त्यामुळे तिसऱ्या पंचांनी विराट बाद असल्याचा मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला.

Web Title :- IND vs AUS | fans angry on umpire nitin menon for controversial lbw decision against virat kohli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन