Ind Vs Aus : पुजारा, शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाला सतावले; सामना अर्निणित अवस्थेकडे झुकला

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच सतावले आहे. त्यांच्या भक्कम खेळीने लंचपर्यंत भारताने १ बाद ८३ अशी सावध सुरुवात केली आहे. आता केवळ दोन सत्राचा खेळ बाकी आहे. त्यामुळे हा सामना अर्निणित अवस्थेकडे झुकला आहे. सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा (Ind Vs Aus) दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला. पहिल्या डाव्याच्या आघाडीवर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते.

काल भारताच्या बिनबाद ४ धावा झाल्या होत्या. त्यामुळे पाचवा संपूर्ण दिवस खेळून काढून सामना अर्निणित ठेवणे हे भारतापुढील सर्वात मोठे काम आहे. पाचव्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर रोहीत शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कमिन्सने त्याला ७ धावांवर बाद केले. नवव्या षटकातच भारताला हा मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ऑस्ट्रेलियाला कोणतीही संधी मिळू दिली नाही. एका बाजूला शुभमन गिल जोरात फटकेबाजी करीत असताना चेतेश्वर पुजारा याने नेहमीप्रमाणे खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजींनी या दोघांवर आखुड टप्प्याचे बॉल टाकून, बाऊंसर टाकून विचलित करण्याचा प्रयत्न केला. काही बॉलनी या दोघांच्या शरीराचा वेध घेतला. तरीही पुजारा निश्चय राहून खेळत आहे. लंचपर्यंत चेतेश्वर पुजारा याने तब्बल ९० चेंडु खेळून ८ धावा केल्या आहेत. दुसरीकडे शुभमन गिल याने ११७ चेंडुत ६४ धावा फटकाविल्या आहेत. त्यात त्याने एक षटकार आणि ५ खणखणीत चौकार मारले आहेत. लंचवेळी खेळ थांबला तेव्हा भारताने १ बाद ८३ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली आहे.

गाबाच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात अजूनपर्यंत कोणत्याही संघाने २५० धावा करु शकला नाही. भारताला विजयासाठी २४५ धावांची आवश्यकता आहे. उरलेल्या षटकांमध्ये इतका धावा करणे शक्य नाही. त्यामुळे सामना अर्निणित ठेवण्यासाठी अजून दोन सत्र भारतीयांना खेळून काढावी लागणार आहेत.