Ind Vs Pak T20 World Cup | ‘विराट’च्या बाजीगर खेळीने अनेक बुकी ‘बरबाद’ ! ‘पाकिस्तान’चा संघच नव्हे तर ‘बुकी’ही हारले, ‘टीम इंडिया’समर्थक झाले ‘मालामाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ind Vs Pak T20 World Cup | क्रिकेट जगतात परंपरागत प्रतिस्पर्धी मानल्या जाणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघादरम्यान रविवारी झालेल्या रोमांचक लढतीत विराट कोहली (Virat Kohli) ‘बाजीगर’ ठरला. क्रिकेट रसिकांची उत्कंठता ताणून धरलेल्या या मॅचवर हजारो कोटींचा सट्टा लावला गेला. पाकिस्तानवर पैसे लावणारे बुकी आणि त्यांचे समर्थक बरबाद झाले. त्याचवेळी भारतावर पैसे लावणारे समर्थक लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला मालामाल झाले आहेत. (Ind Vs Pak T20 World Cup)

 

भारत -पाकिस्तान सामना आणि त्यात विश्वचषक म्हणजे क्रिकेट बुकीसाठी एक मोठी पर्वणी असते. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक रेकॉर्डब्रेक सट्टा रविवारच्या सामन्यावर लावला गेल्याचे सांगितले जाते. त्यात रविवार असल्याने बुकींनी आधीच तयारी करुन ठेवली होती.

 

या सटोडियाच्या बाजाराचा आढावा घेतल्यावर बुकीचा अंदाज पाकिस्तान जिंकणार असाच सुरुवातीपासून होता. त्याप्रमाणे बुकींनी नेहमीप्रमाणे डाव टाकला होता. सामना सुरु होण्याच्या वेळी बुकींनी भारताचा रेट ६० पैसे ठेवला होता.  पाकिस्तानची पहिली विकेट गेल्यावर हा रेट ४० पैशांवर आला. पहिला डाव संपेपर्यंत सटोडिया बाजारात तब्बल दोन हजार कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. मध्यंतराच्या वेळी हा भाव ३० पैशांपर्यंत खाली आला होता. (Ind Vs Pak T20 World Cup)

दुसर्‍या डावात भारताच्या जशा विकेट पडत गेल्या, तसा बुकींनी भारताचा भाव वाढविण्यास सुरुवात केली. शेवटी तर भारताचा भाव 7 रुपये इतका दिला गेला. अनेक बुकींनी तर भारतीय संघाच्या बाजुने खेळण्याचे टाळले. सटोडियांनी पाकिस्तानला विजय गृहीत धरुनच दर निश्चित करण्यास सुरुवात केली होती. भारताची स्थिती चांगली नसल्याने बुकींचे हौसले बुलंद झाले होते.

 

भारत पराजयाच्या दारात उभा असतानाच कोहलीने एक विराट खेळी केली.
शेवटच्या तीन षटकात विराटने केलेल्या खेळीने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
तसा सट्टा बाजाराचाही रंग बदलून टाकला.
विराट आणि हार्दिक पंड्याची जोडी जमली तशी सटोडियांमध्ये अस्वस्थता सुरु झाली.
अगदी हारण्याच्या स्थिती असलेली टीम इंडियाने सामना जिंकला आणि पाकिस्तानच्या बाजूने खेळी करणारे बुकीही हारले.
विराटच्या दमदार खेळीने पाकिस्तानचा संघच नव्हे तर देशाविदेशातील बुकींही शेकडो कोटींना गारद झाले.

 

Web Title :- Ind Vs Pak T20 World Cup | Many bookies ‘ruined’ by ‘Virat’s game’!
Not only the team of ‘Pakistan’ but also the ‘bookie’ lost, ‘Malamal’ became a supporter of ‘Team India’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा