Pune Accident News | दुर्दैवी ! कचरा वाहतूक करणार्‍या कंटेनरची दुचाकीला धडक; सॅलसबरी पार्कमधील महिलेचा जागेवरच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कचरा वाहतूक करणार्‍या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागेवर मृत्यु (Death) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा अपघात नेहरु रोडवर सोनावणे हॉस्पिटलजवळ (Sonawane Hospital, Nehru Road) सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. लिलावती लाहोटिया Lilavati Lahotia (वय ७५, रा. सॅलसबरी पार्क) असे या महिलेचे नाव आहे. (Pune Accident News)

 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वार व पुणे महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा कंटेनर हा सेव्हन लव्हज चौकाकडून पुणे स्टेशनकडे नेहरु रोडने जात होते. सोनावणे हॉस्पिटलजवळ कंटेनरची दुचाकीला धडक बसली. त्यात महिला रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला. त्यातच तिचा मृत्यु झाला.

 

Web Title :- Pune Accident News | Unfortunate! Garbage transport container collides with bike; A woman in Salisbury Park died on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा