MLA Eknath Khadse | …अनेक बड्या राजकारण्यांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा थेट इशारा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांच्या पाठीमागे पुन्हा चौकशीचा ससेमीरा लागला आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari MIDC Land Scam Case) एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse ) यांची पुन्हा चौकशी होणार आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने आक्षेप घेतला की ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास झालेला नाही. यामुळे न्यायालयाने पुन्हा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

यातील तक्रारदार हेमंत गावंडे (Hemant Gawande) हे भाजपा (BJP) नेत्यांच्या इशार्‍यावर हे उद्योग करत असल्याचा आरोप खडसे हे सातत्याने करत आले आहेत. आता पुन्हा एकदा खडसेंनी (MLA Eknath Khadse) गावंडे यांचे एक जुने प्रकरण बाहेर आले तर अनेक बड्या राजकारण्यांचे पितळ उघडे पडेल असा थेट इशारा दिला आहे. ते आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

खडसे यांनी याप्रकरणी गौप्यस्फोट करताना म्हटले की, भोसरी येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात तक्रारदार असलेले हेमंत गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन (Pune Agricultural College Land) हडपण्याचा उद्देश मी हाणून पाडला. या व्यक्तीशी अनेक राजकारण्यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे कृषी महाविद्यालय जमीन प्रकरण उघड झाल्यास राज्यभरातील अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते.

 

गावंडे यांनी तक्रार का दिली, याबाबत माहिती देताना खडसे म्हणाले, गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन हडपण्याचा डाव होता.
त्यावेळी मी विरोधी पक्ष नेता असताना विधीमंडळात आवाज उठविला.
त्यानंतर सरकार बदलले व माझ्याकडे कृषी खाते आले व या संदर्भात महाविद्यालयाच्या अधिष्ठांतांना तक्रार देण्यास सांगितली.
त्यानुसार हेमंत गावंडे यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला. त्यामुळेच त्यांनी भोसरी प्रकरणाशी आपला संबंध जोडला.

गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. गावंडे यांच्याशी हितसंबंध असलेल्यांमध्ये अनेक मोठी नावे आहेत.
पुणे कृषी महाविद्यालयाचे जमीन प्रकरण उघड झाल्यास अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते,
असा इशारा खडसे यांनी दिला.

 

Web Title :- MLA Eknath Khadse | after the agricultural college land case in pune the many people will be exposed says ncp mlc eknath khadse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याचा शिंदे गटाने घेतला धसका, शेतकर्‍यांच्या विषयावरही राजकारण, ’असा’ असतो Event! म्हणत उडवली खिल्ली

Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’