Ind vs SA | गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेचा ‘तो’ रेकॉर्ड मोडण्याचे टीम इंडियासमोर आहे लक्ष्य

गुवाहाटी :: वृत्तसंस्था – Ind vs SA | भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातला दुसरा टी20 सामना आज गुवाहाटीत (Guwahati) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारताने तिरुअनंतपूरममधील (Thiruvananthapuram) पहिला टी20 सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज होणार सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. याच दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा (Ind vs SA) एक विक्रमही मोडण्याच्या तयारीत असणार आहे. हा रेकॉर्ड म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं भारतात आजवर एकही टी20 मालिका गमावलेली नाही. जर आज दक्षिण आफ्रिका गुवाहाटीत हरली तर दक्षिण आफ्रिकेचा भारतीय भूमीवर झालेला हा पहिलाच पराभव असणार आहे.

काय आहे दक्षिण आफ्रिकेचा विक्रम
2015-16 च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने ती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती. यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशी बरोबरीत सोडवली. त्यामुळे आजचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा हा रेकॉर्ड मोडण्याचे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे. (Ind vs SA)

 

गुवाहाटीत भारतीय संघात बदल?
वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला (Austrelia) रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाकडे आता सरावासाठी दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संघात घेण्यात आले आहे. मात्र त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळणार कि दुसरा कोणाचा नंबर लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कुठे पाहता येणार हा सामना?
भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी टी20

बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

2 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.00 वाजता

स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण

 

या मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज

 

दक्षिण आफ्रिकेचा संघ : तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज,
एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा,
रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो

 

Web Title :- Ind vs SA | india vs south africa 2nd t20 at guwahati on sundya india eyes on series win Sport News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप