Coronavirus : इंदापूर तालुक्यात गेल्या 24 तासात एका कैद्यासह 19 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

इंदापूर  : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत फास्ट रॅपिड अ‍ॅटिंजन टेस्ट” व बारामती येथील खासगी रूग्णांलयामध्ये दिनांक 29 आगष्ट 2020 रोजी दिवसभरात घेण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये आज सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत इंदापूर सबजेलमधील एक कैद्यासह 19 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असल्याची माहीती इदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके यांनी दीली आहे.

शनिवार दिनांक.29 आगष्ट 2020 रोजी इंदापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत फास्ट अ‍ॅटिंजन रॅपीड टेस्टमध्ये एकुण 13 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन त्यामध्ये इंदापूर सबजेलमधील 32 वर्षीय पुरूष, बावडा येथील 39 वर्षीय पुरूष, डाळज नं.1 येथील 65 वर्षीय जेष्ठ महीला, इंदापूर शास्त्रीचौक येथील 32 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, लाखेवाडी येथील 25 वर्षीय व 22 वर्षीय युवती, इंदापूर नेहरू चौक 21 वर्षीय युवक, घोरपडवाडी येथील 25 वर्षीय युवक व 55 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 38 वर्षीय महीला व 30 वर्षीय महीला व तरंगवाडी येथील 30 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये इंदापूर तालुक्यातील एकुण 20 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी दिवसभरात 6 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असुन 14 जण निगेटीव्ह आले आहेत.यामध्ये निमगाव केतकी 25 वर्षीय युवक, तर काळा मळा निमगाव केथकी येथील 38 वर्षीय पुरूष, वालचंदनगर गुलमोहर सोसायटी येथील 9 वर्षीय चिमुकली, 34 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय महीला व इंदापूर खडकपुरा येथील 41 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर परवा इंदापूर कोविड केअर सेंटर येथे 94 जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्याचा तपासणी रिपोर्ट पूणे येथील प्रयोग शाळेकडे प्रलंबीत असुन उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके यांनी दीली आहे.