इंदापूर तालुक्यात आणखी 3 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले, शंभरीकडे वाटचाल

इंदापूर  : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे)  –   इंदापूर तालुक्यात कोरोना संक्रमणाचा उद्रेक थांबता थांबत नसल्याने नागरीकात घबराटीचे वातावरण आहे.तर कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांचा आकडा हा दीवसेंदिवस वाढत असल्याने रूग्णांची वाढती संख्या ही इंदापूर तालुक्यातील नागरीकांची चिंता वाढविणारी बाब आहे.त्यातच कोरोना आजाराबाबत सर्वत्र पसरत असलेल्या वेगवेगळ्या अफवा व त्यावरील उपचार पद्धतीत असलेली तफावत यामुळे नागरीकांमध्ये दर दीवसाला सभ्रंमाचे वातावरण निर्माण होत आहे. इंदापूर तालुक्यातील, शहर, गावपातळीपासुन ते ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील सर्वसामाण्य शेतकरी कुटुंबापर्यंत कोरोनाची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने संपूर्ण तालुका कोरोनाच्या दहशतीखाली असल्याचे आज सापडलेल्या पाॅझीटीव्ह रूग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या एकुण 12 संशयीतांचे घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी वैद्यकीय पथकाकडून उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर येथे सोमवारी 18 जुलै रोजी सकाळी घेण्यात आले होते.व सदरचे स्वॅब पूणे येथील प्रयोग शाळेत कोरोना टेस्ट तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचा तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन एकुण 12 पैकी 3 जणांचा रिपोर्ट हा कोरोना पाझीटीव्ह आला असुन बाकी 9 जण निगेटीव्ह असल्याचे स्पस्ट झाले असुन याबाबतची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

शूक्रवार दि. 18 रोज 12 संशयीतांचे स्वॅबचे नमुने शनिवारी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाकडून इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आले होते.सदर स्वॅबचे नमुणे कोरोना टेस्ट तपासणीसाठी पूणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. सदरचा तपासणी अहवाल आज सोमवार दि. 20 रोजी वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला असुन 12 पैकी 3 जण कोरोना पाझीटीव्ह आढळुन आले आसल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन इंदापूर तालुक्याची डेंजर झोनकडे झपाट्याने वाटचाल सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन तालुक्यातील नागरीक कोरोनाबाबत अजुनही पूर्ण खबरदारी घेत नसल्याचे व नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असुन नागरीकांनी नियम व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील दोन व पळसदेव येथील एक असे एकुण तीनजण पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन तालुक्यात कोरोनाचा उद्रेक थांबायचे नावच घेत नसल्याचे चीत्र असुन पुढील काळात कोरोनाचा कहर इंदापूर तालुक्यात पहायला मीळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असुन इंदापूर तालुका पूणे जिल्ह्यात हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे चीत्र आहे. पाॅझीटीव्ह रूग्ण सापडलेल्या गावातील लगतचा भाग खबरदारीचा उपाय म्हणून संबधीत प्रशासनाकडून सील करण्याची कार्यवाही सुरू असुन नागरीकांनी नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.