Coronavirus : इंदापूर तालुक्याचं कोरोनामुळं टेन्शन वाढलं, आणखी 13 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील 14 जणांचे टेस्ट रिपोर्ट दिनांक 17 जुलै रोजी कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले होते.दरम्यानच्या काळात त्यांचे संपर्कात आलेल्या 76 जणांचे घशातील द्रवाचे (स्वॅब) नमुणे रवीवारी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय येथे घेण्यात आले होते. सदरचे स्वॅब नमुणे पूणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.सदर तपासणी रिपोर्ट नूकतेच प्राप्त झाले असुन 76 पैकी 13 जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आले असुन 63 जण कोरोना निगेटीव्ह आल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापुर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलया अंतर्गत इंदापूर तालुक्याच्या विविध भागात पाॅझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 527 संशयीतांचे स्वॅब नमुणे हे 20 जुलै अखेर कोरोना टेस्ट तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात घेण्यात आले होते.त्यांची तपासणी पूणे येथील प्रयोग शाळेत करण्यात आली असुन त्यापैकी आजअखेर एकूण 94 रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आले आहेत. तर 38 रूग्ण बरे होउन घरी परतले असुन सध्या एकूण 56 पाॅझीटीव्ह रूग्ण हे इंदापूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असुन पैकी 5 जण मृत पावलेले आहेततर आज आलेल्या रीपोर्टमध्ये वरकुटे 9, निमगाव केतकी २, गोतोंडी -1, व मदनवाडी 1 असे एकूण 13 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.

कोरोनाच्या बाबतीत उपलब्ध स्थीतीचा आढावा घेतल्यास इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे रूग्णं बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.कोरोना आजारावर देशात कुठेही कसलेही औषध किंवा लस उपलब्ध नसताना इंदापूरात जवळ जवळ निम्मे रूग्णं बरे होउन घरी गेल्याने रूग्णांना सेवा देणार्‍या वैद्यकीय पथकाचे खरे कोरोना योद्धा म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे. तर लाॅकडाउन सुरू झाल्यापासुन आज अखेर इंदापूर तालुक्यात बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांच्या संपर्कात आल्याने आनेकांना कोरोना संसर्गाची लागण झाली असले बाबतची दप्तरी नोंद असुन तालुक्यातील एकुण पाॅझीटीव्कीव्ह रूग्णांपैकी नीम्मे रूग्णं हे इंदापूरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेवुन बरे झाले असुन नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.