इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 17 हजाराची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन १ लाख १६ हजार ८८२ रुपये निधीचा चेक नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व नगरपरिषद कर्मचारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पूणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे गुरूवार दि. १३ ऑगस्ट रोजी पूणे येथे सुपूर्त करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरपरिषदेचे कर्मचारी गजानन पुंडे, मोहन शिंदे, सुरेश सोनवणे, सुभाष ओहोळ, अमर शेडगे, अशोक शहा, अल्ताफ पठाण, सतीश तारगांवकर, अंकुश बोराटे उपस्थित होते.

सध्याच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये तेथील नागरिकांना मदतीची अत्यंत गरज असून आपणही या कार्यामध्ये मनापासून सहभागी होण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला. इंदापूर नगर परिषदेचे कर्मचारी सर्व कार्यामध्ये सक्रीय सहभागी असून प्रशासकीय कार्यातील झिरो पेंडन्सी असो की स्वच्छता उपक्रम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा या सर्व कार्यात ते अग्रेसर राहून आपले कार्य पार पाडत आहेत. सढळ हाताने मदत करीत आज एक दिवसाचे वेतन पूरग्रस्त नागरिकासाठी दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंदापूर नगरपरिषदेने १५ ऑगस्ट रोजी अटल आनंद घन वन अंतर्गत मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला असून यामध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, स्वयंसेवी संस्था, प्रशासन विभाग, गणेश मंडळे सहभागी होणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like