इंदापूरमध्ये लहान माशांची अवैध तस्करी उघड, 7  जणांना अटक 

बाभूळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – प्रतिबंधीत उजनी पाणलोट क्षेत्रात लहान मासे पकडण्यास शासन नियमानुसार बंदी आहे. तरी देखील काही जण लपून छपून मासेमारी करत असतात. सोमवारीही मासेमारी करून सुकविलेले लहान मासे बेकायदेशीररीत्या तस्करी करून घेऊन जात असलेला महिंद्रा पिकअप टॅम्पो इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. लहान सुक्या मासळीच्या ४८ गोण्या जप्त करण्यात आल्या असून सात जणांना पोलिसांनी अटक आलेली आहे. याबाबतची फिर्याद पाटबंधारे उपविभागीय अभियंता संजय नारायन मेटे यांनी दिली आहे.

नारायण आसाराम बनारे (वय ४३), रोहिदास दौलु बनारे (वय २१), आकाश नारायण बनारे (वय २०), लक्ष्मन नारायण बनारे (वय२३), विलास नारायण बनारे (वय १९, सर्व रा. सरस्वतीनगर इंदापूर, ता. इंदापुर), विठ्ठल कांतीलाल गव्हाणे
(वय २६, रा. पळसदेव, ता. इंदापूर), बाळासाहेब वसंत चितारे (वय ३८, रा. पिंपरी खु. ता. इंदापूर), एकनाथ बळीराम विचारे (वय ३२, रा. कालठण नं. २, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांचेकडुन ६ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांनी सोमवारी दुपारी ३ वा. इंदापूर अकलुज बायपास रोड, सरस्वतीनगर येथे एका जीपला थांबवले. जीपमधील नारायण आसाराम बनारे यांना सदर मासळीबाबत विचारना केली.यावेळी त्याचेकडे मासे विक्रीबाबतचा परवाना नसल्याचे आढळुन आल्याने जीपमध्ये असलेल्या सातजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई इंदापूर वरीष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांचेसह पोलीस नाईक दिपक पालखे, पोलीस शिपाई अमीत चव्हाण, विशाल चौधर, विक्रमसिंह जाधव यांचे पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पालखे हे करत आहेत.

You might also like