Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Indapur Tehsildar Attack Case | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाने (Porsche Car Accident Pune) सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच पुणे जिल्ह्यातील (Pune District) इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील (Tehsildar Shrikant Patil) यांच्यावर भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हल्लेखोरांनी गाडीचेही नुकसान केले आहे. घटनेनंतर शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी गाडीमधून आलेल्या हल्लेखोरांनी संविधान चौकात तहसिलदारांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रथम गाडीचे चालक मंखरे यांचा डोळ्यात मिरची पूड टाकली, नंतर लोखंडी गजाने हल्ला केला. हल्ल्यात श्रीकांत पाटील यांना गंभीर इजा झालेली नाही.(Indapur Tehsildar Attack Case)

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टवर म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत.

रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाहीत.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य?
आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, अशा शब्दात रोहित पवार
यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात ठाकरे गटाचे (Thackeray UBT) नगरसेवक विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar)
यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यावर फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले होते की, विरोधी पक्षाची अशी स्थिती आहे की एखाद्या गाडीखाली
श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी