भीम शक्ती संघटनेच्या शहर बंदला इंदापूरकरांचा प्रतिसाद

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे व कत्तलखाने बंद करण्यात यावेत व दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा र.नं. ८५९/१७, कलम ३९५ मधील आरोपींना अटक करण्यात यावी इत्यादी मागण्या संदर्भात भिम शक्ती संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष युवराज पोळ यांनी २६ जानेवारी २०२१ पासुन इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले होते व त्या निषेधार्थ दि.३० रोजी इंदापूर शहर बंद पुकारण्यात आले होते. इंदापूर बंदला इंदापूरकरांनी पूर्ण पाठींबा देत शहर बंद ठेवले. तर कलम ३९५ मधील गुन्ह्याचा फेरतपास पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन प्रभारी पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे यांनी उपोषणकर्ते यांना दील्यानंतर युवराज पोळ यांनी आमरण उपोषण स्थगीत करत असल्याची माहीती पत्रकार पराषदेत बोलताना दीली.

इंदापूर शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोपावले असुन त्यामुळे शहरातील सर्वसामाण्य नागरिक व सुशिक्षीत युवा वर्गाला याचा मोठा त्रास होत आहेत. अवैध धंद्याच्या नादी लागुन युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र तालुक्यात आनेक ठीकाणी पहायला मीळत आहे.तर शहरात राजरोसपणे सुरू असलेला अवैध मटका, हातभट्टी दारू, गांजा, चरस, अफू, सोरट, अवैध वाहतुक, अवैध उत्खनन,वेशा व्यवसाय यासारखे धंदे खुलेआम सुरू असल्याने शहरात गुंडागर्दी, दादागीरीसारखे प्रकार वाढु लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी भिम शक्ती संघटनेच्या वतीने करण्यात येवुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

तर उपोषणकर्ते यांचे घरी २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दरोडा पडल्याबाबतची तक्रार युवराज पोळ यांनी त्याच दिवशी इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.सदर घटनेतील गुन्ह्याची नोंद इंदापूर पोलीस दप्तरी होउन ८५९/१७ नंबरने कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींवर अद्याप कारवाई झाली नसल्याने संबधीतावर कारवाई व्हावी या मागणीसंदर्भात युवराज पोळ यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट असुन त्या प्रकरणाची कागदपत्र ही न्यायालयात असल्याने न्यायालयाकडे कागदपत्रांची मागणी करून घेवुन संबधीत प्रकरणाचा फेर तपास पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे यांनी ऊपोषणकर्ते यांना दील्याने भिम शक्ती संघटनेचे सलग पाच दिवस सुरू असलेले आमरण उपोषण स्थगीत करण्यात येत असल्याची माहीती युवराज पोळ यांनी दीली.