Coronavirus : देशात फेब्रुवारी 2021 पर्यंत निम्म्या लोकसंख्येला ‘कोरोना’ची लागण ? सरकारी तज्ञ म्हणतात…

पोलीसनामा ऑनलाईनः चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील बहुतांश देशात गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन ते अनलॉक प्रक्रीया सुरु झाली आहे. या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. फेब्रुवारी 2021 पर्यंत देशातील निम्या लोकसंख्येला म्हणजेच 65 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज केंद्र सरकारकडून बनवलेल्या एका तज्ञ्ज्ञांच्या समितीने वर्तवला आहे. जर सामाजिक अंतर, मास्क घालण्याची जबाबदारी घेतली नाही, तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. दुर्गापुजा, दिवाळी, छटपूजा या सणासुदीच्या काळात कोरोना संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ञ्ज्ञांच्या समितीने दिली आहे.

आतापर्यंत भारतात 75 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अमेरीकाच भारताच्या पुढे आहे. गेल्या एक महिन्यांपासून दररोज 61 हजार 390 रुग्णांची नोंद होत आहे. आयायटी कानपूरचे सदस्य आणि पॅनलचे सदस्य प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी न्युज रायटर्सला सांगितले की, आमच्या गणितीय मॉडेलच्या अंदाजानुसार, आतापर्यंत देशातील जवळपास 30 टक्के लोकसंख्येला लागण झाली असून फेब्रुवारीपर्यंत ही 50 टक्क्यांपर्यंत पोहचेल.

सीईआरओच्या सर्व्हेनुसार सप्टेंबरपर्यंत भारतातील जवळपास 14 टक्के लोकांना कोरनाची लागण झाली होती.परंतु पॅनच्या म्हणण्यानुसार ही आकडेवारी 30 टक्के आहे. आम्ही एक नवीन मॉडेल तयार केले आहे. ज्यामध्ये नोंद न झालेल्या रुग्णांनाही ओळखते. जेणेकरून संक्रमित झालेल्या लोकांना दोन भागात विभागले जाऊ शकते, असे प्रा. अग्रवाल म्हणाले. सेरो सर्वेक्षण विपरीत, विषाणूशास्त्रज्ञ वैज्ञानिक आणि इतर तज्ञ्ज्ञांच्या समितीने गणिताच्या मॉडेलवर विश्वास ठेवला आहे. रविवारी या समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.

तर दुसरीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगातील अऩेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे. संशोधकांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनातून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी 2021 मध्ये देशात केवळ 40 हजार अॅक्टीव्ह रुग्ण उरतील, असा दावा आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. देशात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही. तसेच आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतांना पाहत आहोत, असे ते म्हणाले. सोमवारी कोरोनाचे नवे 55 हजार रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या 75 लाख 50 हजार 278 झाली. एकूण बरे झालेल्यांची संख्या 66 लाख 63 हजार 608 आहे. देशात 7 लाख 72 हजार 55 रुग्ण उपचार घेत असून सलग चौथ्या दिवशी हा आकडा 8 लाखापेक्षा कमी होता.