भारत-चीन संघर्षात तिबेटीयन वंशाचा जवान शहीद

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनने पॅन्गाँग सरोवराजवळ केलेली घुसखोरी रोखताना भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्स दलातील तिबेटीयन वंशाचा जवान शहीद झाला. शनिवारी झालेल्या भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या ४८ तासानंतर जीवितहानी झाल्याची बाब समोर आली.

अल जझीराने ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. या संघर्षात झालेली जीवितहानी भारतीय लष्कराने किंवा केंद्र सरकारने कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही. मात्र, एएफपीच्या बातमीने भारतात असणाऱ्या निर्वासित तिबेट संसद सदस्या डोल्कर ल्हाग्यारी यांनी एका तिबेटीयन वंशाचा जवान शहीद झाल्याचे सांगितले. त्यांनी शहीद तिबेटीयन जवानाचे नाव सांगितले नाही. स्पेशल फ्रंटिरियर फोर्स दलातील इतरही जवान जखमी झाले आहेत.

चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी चीन-भारत संघर्षात चीनच्या सैन्याची जीवितहानी झाली नाही, असे सांगितले आहे. हुआ चुनयिंग यांनी भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याचा आरोप केला. स्पेशल फ्रंटियर फोर्स दलात तिबेटीयन नागरिकांचा समावेश आहे. हे स्पेशल युनिट थेटपणे भारतीय लष्कराच्या अधिकारामध्ये येत नाही. याला विकास बटालियन असेही म्हटले जाते. जून महिन्यातील गलवान खोऱ्यातील झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर, चीनचे ३० ते ४० जवान ठार झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर शनिवारी झालेल्या संघर्षात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. लडाखमध्ये पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळील भागात चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. भारताच्या या आक्रमकतेनंतर चीनची नाचक्की झाली आहे. त्यानंतर आता चीनकडून आपली बाजू सावरण्यासाठी ‘मिशन डॅमेज कंट्रोल’ सुरू करण्यात आले आहे.