Corona Update : 24 तासात आली 2.57 लाख नवीन प्रकरणे, एक लाख अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत सध्या कठीण काळातून जात आहे. कोरोना व्हायरस अनियंत्रित आहे. दररोज अडीच लाखांपेक्षा जास्त केस समोर येत आहेत आणि रोजच्या मृत्यूंचा आकडा सुद्धा चार हजारच्या पुढे कायम आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 257,299 नवीन कोरोना केस आल्या आणि 4194 संक्रमितांचा मृत्यू झाला. तर 3,57,630 लोक कोरोनातून बरे झाले आहेत, म्हणजे 1 लाख 4 हजार 525 अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. यापूर्वी गुरुवारी 2.59 लाख नवीन केस नोंदल्या होत्या आणि 4209 संक्रमितांचा मृत्यू झाला होता.

21 मेपर्यंत देशभरात 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. काल 14 लाख 58 हजार 895 डोस देण्यात आले. आतापर्यंत 32 कोटी 64 लाखापेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल सुमारे 20.66 लाख कोरोना सॅम्पल तपासण्यात आले, ज्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्केपेक्षा जास्त होता.

देशात आज कोरोनाची ताजी स्थिती –
* एकुण कोरोना केस – दोन कोटी 62 लाख 89 हजार 290
* एकुण डिस्चार्ज – दोन कोटी 30 लाख 70 हजार 365
* एकुण अ‍ॅक्टिव्ह केस – 29 लाख 23 हजार 400
* एकुण मृत्यू – 2 लाख 95 हजार 525

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.12 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 87 टक्केपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह केस कमी होऊन 12 टक्केपेक्षा कमी झाल्या आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केस प्रकरणात जगात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. एकुण संक्रमितांच्या संख्येत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात 30 हजारपेक्षा कमी नवीन रूग्ण
महाराष्ट्रात लागोपाठ सातव्या दिवशी 35 हजारपेक्षा कमी आणि दुसर्‍या दिवशी 30 हजारपेक्षा कमी कोरोना केस नोंदल्या गेल्या आहेत. राज्यात मागील 24 तासात 29,644 नवीन प्रकरणे समोर आली आणि 555 मृत्यू झाले. मात्र, 44,493 रूग्णांची रिकव्हरी सुद्धा झाली आहे. महाराष्ट्रात एकुण प्रकरणे वाढून 55 लाख 27 हजार 92 झाली आहेत. यापैकी एकुण 50 लाख 70 हजार 801 रूग्ण बरे झाले. एकुण 86,618 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. 3 लाख 67 हजार 121 लोक अजूनही संक्रमित आहेत.