India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : India First Electric Cruiser Bike | कोमाकी इलेक्ट्रिक कंपनी (Komaki Electric Company) भारतात इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooters) च्या सुरूवातीनंतर आता इलेक्ट्रिक बाईक बनवण्याकडे पावले टाकत आहे. कंपनी भारतात पहिली क्रूझर बाईक (cruiser bike) तयार करण्याची योजना बनवत आहे. कंपनीने बाईकची एक टीझर इमेज सुद्धा जारी केली आहे. या स्वदेशी कंपनीचा दावा आहे की, ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 250 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. (India First Electric Cruiser Bike)

 

सर्वात मोठा बॅटरी पॅक

कोमाकीची रेंजर बाईक (Komaki’s Ranger bike) पुढील वर्षी जानेवारीत लाँच करण्याची योजना आहे. ज्याबाबत कंपनीने मोठे दावे केले आहेत. या बाईकमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बॅटरी पॅक दिला जाईल, जो 4 किलोवॅटचा असू शकतो. हा आतापर्यंतच्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये सर्वात जास्त आहे.

 

सिंगल चार्जमध्ये दिल्ली ते चंदीगढ

कंपनीच्या दाव्यानुसार या रेंजमध्ये ही बाईक दिल्लीहून चंदीगढला पोहचू शकते. कोमाकी रेंजरमध्ये 5,000 वॅटची मोटर असेल, जी बाईकला जास्त उर्जा प्रदान करेल. याशिवाय, क्रूझर इलेक्ट्रिक बाईक क्रूझ कंट्रोल, रिपेयर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लूटूथ आणि एक प्रगत ब्रेकिंग सिस्टम सारख्या सुविधा असतील. (India First Electric Cruiser Bike)

 

किंमत

या बाईकच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
लाँचिंगनंतर याबाबत माहिती मिळू शकते. परंतु कंपनीचे म्हणणे आहे की,
ती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी बजेटमध्ये बाईक जारी केली जाईल.

 

कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा (Gunjan Malhotra, director, Komaki Electric Division)
यांनी म्हटले की, काही गोष्टी आहेत ज्यांना अंतिम रूप देण्याची आवश्यकता आहे.
परंतु आम्ही किंमत स्वस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यांनी म्हटले की, सामान्य जनतेपर्यंत ही इलेक्ट्रिक क्रूझर बाईक पोहचवायची आहे.
कोमाकी जवळपास 30,000 रुपयांपासून 1 लाख रुपयांच्या दरम्यान एक्स-शोरूम किमतीसह अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक देते.

 

Web Title :- India First Electric Cruiser Bike | domestic company komaki bringing india first electric cruiser bike will give a range of up to 250km in full charge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा