Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करुन वाहन चालवणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडणार आहे. जर तुम्ही वाहतुक नियमांचे उल्लंघन केले तर तुमच्या खिशाला भारी पडेल, सोबतच तीन महिन्यासाठी वाहन परवानाही निलंबित (Vehicle license Suspended) होईल. मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicle Act) विविध कलमांतर्गत राज्याने दंडाच्या वाढीची (Maharashtra Hikes Traffic Fines) अधिसूचना जारी केली आहे, जी 1 डिसेंबर पासून राज्यात लागू झाली आहे. त्यामुळे राज्यात वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडात मोठी वाढ (Maharashtra Hikes Traffic Fines) झाली आहे.

 

सुधारीत दंड

दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय (No Helmet Fine) प्रवास केल्यास 500 रुपये दंडात बदल करण्यात आला आहे. पहिल्यावेळी उल्लंघन केले तर 500 रुपये दंड, मात्र दुसऱ्यांदा उल्लंघन केले तर 1500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट साठीचा (triple seat) दंड 200 रुपयांवरुन 1000 रुपये करण्यात आला आहे.

 

आधी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी धोकादायक, बेपर्वा वाहन चालवले तर 1000 रुपये दंड होता. मात्र आता यामध्ये सुधारणा केली असून दुचाकीसाठी 1000 रुपये तर इतर वाहनांसाठी 2000 रुपये दंड आकारला जाईल. (Maharashtra Hikes Traffic Fines)

 

वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याचा दंड 200 वरुन 500 रुपये करण्यात आला आहे. हॉर्न वाजवल्यास 500 रुपयांवरुन 1000 रुपये दंड करण्यात आला आहे. त्याप्रमाणे फॅन्सी नंबर प्लेटसाठी (Fancy Number Plate) 1000 रुपये दंड होता, आता सुधारित नियमांनुसार पहिल्यांदा उल्लंघन केले तर 500 आणि त्यानंतर 1500 रुपये दंड केला जाईल. तर हायस्पिड ड्रायव्हिंगसाठी (High Speed driving) 5000 हजारावरुन 10,000 रुपये दंड आकारला जाईल. (Maharashtra Hikes Traffic Fines)

 

नो-पार्किंग साठी 500 रुपये दंड

वाहनांची बेकायदेशीर पार्किग ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे वाहतुक कोडी सारख्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे नो-पार्किंगमध्ये (no-parking) वाहन उभे केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. केंद्राच्या प्रस्तावानुसार हा दंड 1000 रुपये आहे. मात्र, राज्य सरकारने (Maharashtra Government) सध्या 500 रुपये दंड ठेवला आहे. जो पूर्वी 200 रुपये होता.

 

सीटबेल्टच्या दंडात घट

वाहन चालवताना सीट बेल्ट (Seat belt) घातला नसेल तर 1000 रुपये दंड आकारला जात होता. मात्र, नव्या कायद्यात या दंडाच्या रक्कमेत घट करण्यात आली आहे. आता नव्या नियमानुसार सीटबेल्ट लावला नसेल तर 200 रुपये दंड आकरला जाणार आहे. तसेच विना परवाना वाहन चालवण्यास पूर्वी 1000 रुपये दंड होता. मात्र आता 5000 रुपये आकारला जाणार आहे. (Maharashtra Hikes Traffic Fines)

 

दंडाचा प्रकार : पूर्वीचा दंड आणि सुधारित दंड

– पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास, पळून गेल्यास – 500 वरुन 750 रुपये

– पीयूसी (PUC) नसल्यास – 500 वरुन 1000 रुपये

– वेगाचे उल्लंघन (ट्रॅक्टर) – 500 वरुन 1500 रुपये

– Violation of speed (कार) – 200 वरुन 2000 रुपये

– वेगाचे उल्लंघन (जड वाहन) – 500 वरुन 4000 रुपये

– वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे (दुचाकी व तीनचाकी) – 500 वरुन 1000 रुपये

– Driving करताना मोबाईलवर बोलणे (कार) – 500 वरुन 2000 रुपये

– वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे (जड वाहन) – 500 वरुन 4000 रुपये

– नोंदणी न करता वाहन चालवणे – 5000 वरुन 10,000 रुपये

– विमा नसताना वाहन चालवल्यास – 1000 वरुन 2000 रुपये, दुसऱ्या गुन्ह्याकरता 4000 रुपये

 

Web Title :- Maharashtra Hikes Traffic Fines | Big increase in fines in Motor Vehicle Act in Maharashtra! No-parking, without helmet Rs 500 and for triple seat Rs 1000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा