भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले…

बेंगळुरू :  वृत्तसंस्था – भारतात बेकायदेशीररीत्या सुरु केलेले बिटकॉईन एटीएमवर सायबर गुन्हे पोलिसांनी कारवाई करत सील केले आहे. युनोकॉईन या कंपनीने हे एटीएम बेंगळुरूतील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील केम्स फोर्ट मॉलमध्ये हे एटीएम नुकतेच सुरु केले होते. बिटकॉइनच्या खरेदी आणि विक्रीसाठी हे एटीएम सुरु करण्यात आले होते. भारतात बिटकॉईनच्या व्यवहारावर बंदी असूनहे एटीएम सुरु करण्यात आले होते. एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक हरीश बीव्ही (वय ३७) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

एटीएममधील रोकड चोरणाऱ्या परराज्यातील दोघांना अटक

या कारवाईदरम्यान सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ लॅपटॉप, १ मोबाइल, ३ क्रेडिट कार्ड्स, ५ डेबिट कार्ड्स, १ क्रिप्टोकरन्सी डिवाइस, पासपोर्ट आणि १ लाख ७९ हजार रुपये रक्कम हस्तगत केली आहे.


बिटकॉईन म्हणजे काय?

भारतात जिथे आर्थिक साक्षरता मूळातच कमी आहे, तिथे बिटकॉईन ही संकल्पना तशी अगदीच नवीन आहे.
बिटकॉईन इंडिया सारख्या जवळपास 25 साइट्स आहेत जिथं तुम्ही हे व्यवहार करू शकता. पण बिटकॉईनला कायदेशीर मान्यता नसल्यानं भारतात त्याला फारसा उठाव नाही.पण अमेरिका आणि महत्त्वाच्या युरोपीय देशांमध्ये ते सर्रास वापरली जातात. म्हणून या निमित्तानं बिटकॉईन म्हणजे काय, हे समजणं गरजेचं आहे.

बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साइट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.

‘चौकीदारने सीबीआयच्या संचालकांना हटविले, कारण…’

ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.