भारतीय लष्कराला मोठं यश, चीन बॉर्डरवर 6 नवीन टेकडयांवर केला कब्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमधील चीन सीमेवर भारतीय सैन्याने गेल्या 20 दिवसांत मोठे यश संपादन केले आहे. गेल्या 20 दिवसांत भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवर सहा नवीन टेकड्या ताब्यात घेत पीपल्स लिबरेशन आर्मीच्या योजना उधळून लावण्यात आल्या. भारतीय सैन्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी चिनी सैन्याला या टेकड्या हस्तगत करायच्या होत्या.

सरकारच्या उच्च सूत्रांनी ‘आज तक’ ला सांगितले की, ‘आपल्या जवानांनी सहा नवीन मोठ्या टेकड्या ताब्यात घेतल्या असून यात मगर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला राचाना ला, मोखापरी आणि फिंगर 4 रिज लाइनवरील सर्वात मोठी शिखरे आहेत.’

भारताची चीनवर कुरघोडी

या टेकड्या दक्षिणेकडून उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरतात, असे सूत्रांनी सांगितले या यशामुळे सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट क्षेत्रात भारताला चीनविरोधात एक यश मिळालं आहे.

सूत्रांनी सांगितले की, 29 ऑगस्टनंतर पांगोंग तलावाच्या दक्षिणेकडच्या थाकुंग प्रदेशाच्या दक्षिणेकडील चिनी भागात जेव्हा चिनी सैन्य दलाच्या दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) बाजूने उंच भागावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न केला गेला त्या दरम्यान संघर्ष सुरू झाला होता.

चीनची योजना फोल ठरली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी चीनच्या सैन्याने डोंगर हस्तगत करण्याच्या प्रयत्नांना उधळून लावण्यासाठी पांगोंगच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापर्यंत किमान तीन वेळा हवाई गोळीबार करावा लागला होता.

सूत्रांनी हे देखील स्पष्ट केले की ब्लॅक टॉप आणि हेलमेट टॉप टेकड्या एलएसीच्या चिनी भागात आहेत, तर भारतीय बाजूने व्यापलेली शिखर भारतीय हद्दीत एलएसीवर आहेत. भारतीय सैन्याने शिखर ताब्यात घेतल्यानंतर चिनी सैन्याने आपल्या संयुक्त ब्रिगेडचे सुमारे 3000 अतिरिक्त सैन्य तैनात केले. यात रेजांग ला आणि राचाना ला हाइट्स जवळ इंफेट्री सैनिक असतात.

गेल्या काही आठवड्यांत अतिरिक्त सैन्यासह चिनी सैन्याच्या मोल्डो गॅरिसन देखील पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्णपणे सक्रीय केले आहेत.

चीनच्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले मोठ्या समन्वयाने काम करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नणवाणे यांच्या देखरेखीखाली सैनिकी कारवाई सुरु आहे.