‘कोरोना’ लसीसंदर्भात भारताने बनविला ग्लोबल प्लॅन, पाकिस्तान वगळता सर्व शेजारी देशांना मिळेल मदत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना व्हायरसच्या वेगाने होणार्‍या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस लवकरच भारतात येणार असल्याची माहिती आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर, केंद्र सरकार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच वेगवेगळ्या मार्गांवर काम करत आहे. यात विनामूल्य लसांपासून ते गॅरंटीड पुरवठा या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आता कोरोना लसीबाबत असे वृत्त आले आहे की, केंद्र सरकार या शेजारच्या देशांनाही ही लस पुरविण्याची जागतिक योजना तयार करीत आहे. यात पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचा देखील समावेश आहे.

भारतात सध्या तीन कोरोना लसींची चाचणी सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) बाजारात कोरोना लस आणण्याच्या अगदी जवळ आल्याची माहिती आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेकासह तीन कंपन्या सीरम कंपनीसह भागीदारीत आहेत. कोरोना लसीच्या योजनेशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेसाठी अद्याप कोणतीही अंतिम योजना तयार केलेली नाही. त्याच्या अंतिम फॉर्मसंदर्भात अद्याप कोणतीही योजना तयार केलेली नाही.

कोरोना लसवरील तज्ञांच्या गटामध्ये चर्चा चालू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, लस तयार होण्यास मान्यता मिळाल्यानंतर सरकार या लसीच्या पुरवठ्यासाठी संभाव्य लाभार्थ्यांशी करार करेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या देशांना ही लस दिली जाणार आहे, त्यांचा सतर्कता बाळगून विचार केला जाईल. सरकार जागतिक लस पुरवण्याच्या अनेक मार्गांवर विचार करीत आहे. सरकारच्या योजनेत प्रथम विनामूल्य वितरण समाविष्ट आहे जे कदाचित बांग्लादेश, अफगाणिस्तान सारख्या शेजारच्या देशांपुरते मर्यादित असेल. मात्र, यात पाकिस्तानचा समावेश नाही. असा अंदाज आहे ,की पाकिस्तान चीनमध्ये बनवल्या जाणार्‍या कोरोना लसीवर पाकिस्तान अवलंबून आहे.

दुसर्‍या मॉडेल अंतर्गत कोरोना लस गरीब देशांना अत्यल्प सवलतीत देण्यात येईल. याचा फायदा अनेक आफ्रिकन देशांना होऊ शकतो. तिसर्‍या मॉडेल अंतर्गत बऱ्याच देशांना या लसी बाजारभावावर उपलब्ध करुन देण्यात येतील. जेव्हा लस मोठ्या प्रमाणात तयार होते, तेव्हा ती मुक्त बाजारात वितरीत केली जाईल. चौथ्या मॉडेल अंतर्गत काही देशांकडे भारताच्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल्समध्ये भाग घेण्यासाठी संपर्क साधला जाईल. पाचव्या मॉडेल अंतर्गत, भारत काही देशांना दोन घरगुती लस तयार करण्याची परवानगी देखील देऊ शकते.