India Monsoon Update | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; महाराष्ट्रातही संततधार सुरूच, अनेक भागांना ‘अलर्ट’
नवी दिल्ली/मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – India Monsoon Update | गेल्या काही दिवसांपासून देशात गायब झालेला मान्सून (India Monsoon Update) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमला (Shimala) येथे ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट (Red Alert) आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला. दुसरीकडे पावसानंतर मुंबई (Mumbai), दिल्लीसारख्या (Delhi) मोठ्या शहरांमध्ये पाणी साचले आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे (India Monsoon Update) लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले. सोलन आणि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्याने पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली. कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे मोहल खड्यात अचानक पूर आला आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले. जेसीबीच्या साहाय्याने नुकसान झालेली वाहने बाहेर काढण्यात आली. शिमला, मंडी आणि कुल्लू मध्ये जोरदार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झाले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळपासून दिल्लीत अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील (Haryana) गुरुग्राम जिल्ह्यात पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, कुरुक्षेत्र आणि मोहालीच्या अनेक भागात पाऊस झाला. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस झाला आहे.
मुंबईतही संततधार…
मुंबईत शनिवारीच मान्सूनने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर (Sushma Nayar)
यांच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. 25 जूनपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. यादरम्यान दोन इमारतीही कोसळल्या, त्यात दोघांचा मृत्यू झाला.
Web Title : India Monsoon Update | heavy rain in himachal pradesh and uttarakhand water logging in delhi ncr after rain
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Traffic Disrupted on Old Pune-Mumbai Road and Expressway: Two Accidents Cause Severe Jams, No Casualties Reported
- Tragic Electrocution Incident Claims Man’s Life in Brahma Estate Compound
- Opposition Mounts Against PCMC’s User Charges for Solid Waste Management in Housing Societies
- Residents Express Concerns Over PMC’s Inaction on Dangerous Tree Branches
- Pune Braces for Heavy Rainfall Till Wednesday: Weather Alert and Safety Precautions Advised
Cracking Down on Underage Driving: Pune Implements Hefty Fine of 25,000 Rupees for Parents - Extended Deadline: Over 26,000 Students Enroll in Class XI Online Admissions in Pune
- Creating a Vastu-Friendly Home: 10 Essential Tips for Your Home Makeover