जाणून घ्या पाकिस्तानातील बदनाम बाजार ‘दारा आदमखेल’ च्या बाबतीत ! भारताने UN मध्ये केला उल्लेख

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्र आमसभेत (UNGA) पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मैत्र यांनी इम्रान खानचे प्रत्येक खोटे उघडे पाडले. यावेळी त्यांनी ‘दारा आदमखेल’चा उल्लेख केला. त्यांनी यावेळी सांगितले की, इम्रान खान एक क्रिकेटपटू होते आणि या जेंटलमॅन गेमवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे भाषण ‘दारा आदमखेल’च्या बंदुकांप्रमाणे असभ्यतेच्या शिखरावर पोहोचले आहे.

काय आहे ‘दारा आदमखेल’ :
पेशावरपासून थोड्या अंतरावर दारा आदमखेल हे टेकड्यांनी वेढलेले शहर आहे. येथे अनेक दशके गुन्हेगारी कारवाया घडत आहेत. हे ठिकाण जगभरातील शस्त्रास्त्रांच्या काळ्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेच, परंतु ते तस्करी, ड्रग्जच्या व्यापारासाठी देखील ओळखले जाते. येथे चिनी पिस्तुलांच्या क्रूड प्रतींपासून ते अमेरिकन एम १६ स्वयंचलित रायफल आणि क्लास्निकोव्ह रायफलपर्यंत अनेक शस्त्रे बनतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून त्या अगदी कमी किंमतीला विकल्या जातात.
Dara Adamkhel
या बाजाराला सरकारी संरक्षण मिळते :
दरम्यान, दारा आदमखेलमध्ये सुरू असलेल्या या धंद्याला सरकारी संरक्षण आहे. इतकेच नाही तर हा इथल्या लोकांच्या जगण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण या व्यवसायात सामील आहे. या संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था फक्त या व्यवसायावर अवलंबून आहे. येथे एक शूटिंग रेंज देखील आहे जी सर्व प्रकारच्या स्वयंचलित शास्त्रांच्या तपासण्यासाठी येथे तैनात केलेल्या दलाच्या देखरेखीखाली आहे. येथून आपण कोणत्याही प्रकारचे शस्त्र पाहू किंवा विकत घेऊ शकता. तेथे पाकिस्तान लष्कराच्या गार्डियन युनिटचे मुख्यालय देखील आहे आणि या संपूर्ण क्षेत्रावर पाक सैन्य लक्ष ठेवून आहे.

अवैध शस्त्रांचा खुलेआम व्यापार :
१९८० मध्ये हा बाजार सुरू झाला आणि अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनशी लढण्यासाठी मुजाहिद्दीनने येथून शस्त्रे खरेदी करण्यास सुरवात केली तेव्हा ती चर्चेत आली. यानंतर पाकिस्तानी तालिबान्यांनी ही जागा ताब्यात घेतली आणि ती चालविणे सुरू केले. जरी नवाज शरीफ यांच्या सरकारने याबाबत काही काटेकोरपणा आणि कारवाई करण्याचा प्रयत्न दाखविला, परंतु अद्यापही अवैध शस्त्रास्त्रांचा खुला व्यापार सुरूच आहे, ज्यामुळे दहशतवादाला चालना देण्यात मदत होत आहे. येथे बनवलेल्या शास्त्रांना एक वर्षासाठी हमी दिली जाते आणि ऑर्डर दिल्यानंतर एका आठवड्यात आपण वस्तूंचे वितरण देखील घेऊ शकता. असे म्हणतात की ओसामा बिन लादेनला हा बाजार आवडला होता. तो येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे खरेदी करीत असे.

Visit : Policenama.com