भारतातील पहिली ‘हॉस्पीटल’ ट्रेन पोहचली मुंबईत, आतापर्यंत तब्बल 12 लाख लोकांचा वाचवला ‘जीव’ !

मुंबई : वृत्तसंस्था – भारताची पहिली हॉस्पिटल ट्रेन लाईफलाईन एक्सप्रेस गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहचली. लाइफलाइन एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील दुर्गम भागातील सुमारे 12 लाख रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली आहे. 1991 मध्ये ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. गाडीचे नाव लाइफलाईन एक्स्प्रेस यासाठी ठेवण्यात आले की हे एका प्रकारे फिरणारे हॉस्पिटल आहे.

लाइफलाईन एक्सप्रेसने आतापर्यंत देशातील 19 राज्यांचा प्रवास केला आहे आणि 138 जिल्ह्यांमधील 201 ग्रामीण ठिकाणी भेट दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी १२ लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली. या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेच्या 1.46 लाख रुग्णांचा समावेश आहे.

कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी, ग्रामीण भागातील आणि मागासवर्गीय भागात सर्वप्रथम रूग्णांचे ब्लू प्रिंट तयार केले गेले. मग या ट्रेनमध्ये उपचारासाठी एक तारीख दिली जाते. यानंतर, रुग्णांवर निश्चित वेळेत उपचार केले जातात. या ट्रेनमध्ये तपासणी पासून ते शास्त्रक्रियेपर्यंतचे सर्व उपचार केले जातात.

मोठ्या कंपन्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत या कामात हातभार लावतात, त्यासाठी रूग्णांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. या ट्रेनने आपल्या देशात तसेच जगभरात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. अपंग, प्रौढ आणि बालकांना जागेवरच उपचार देण्यासाठी लाइफलाईन एक्सप्रेस सुरू करण्यात आली.

लाइफलाईन एक्सप्रेस सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या जुन्या डब्यांची दुरुस्ती करून त्याला दवाखान्याचे रूप देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 28 वर्षात फक्त एकच ट्रेन तयार होऊ शकली, तर आतापर्यंत प्रत्येक झोनमध्ये एक ट्रेन असायला हवी होती.

रेल्वे प्रकल्पावर एक ते दीड कोटी रुपये खर्च केले जातात, ज्यामध्ये सरकार पाहिजे असल्यास मदत करू शकते. सुरुवातीच्या काळात या ट्रेनमध्ये आदिवासी भागात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत असे. परंतु, आता प्लास्टिक सर्जरी, ईएनटी आणि कर्करोग सारख्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात.

आरोग्यविषयक वृत्त –