भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार; स्वदेशी ड्रोन ‘रुस्तम-2’ झालं ‘अपग्रेड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध तणावपूर्ण होत आहे. सैन्याकडून सातत्याने मिसाईल्स, हत्याऱ्यांना शक्तिशाली बनवले जात आहे. ज्यामुळे कोणत्याही वेळी गरज पडल्यास शत्रू राष्ट्रांवर दबाव टाकता येऊ शकेल. आता ‘डिफेन्स रिसर्च एँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’च्या (DRDO) माध्यमातून बनविण्यात आलेल्या स्वदेशी ड्रोन ‘रुस्तम-2’च्या टेक्नॉलॉजीला अपग्रेड करत आहे.

नवे ड्रोन पहिल्या ड्रोनच्या तुलनेत शक्तिशाली असून, त्याची मारक क्षमताही वाढली आहे. एप्रिल महिन्यात या ड्रोनची चाचणी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे होत आहे. त्यानंतर नवा रेकॉर्ड कायम करेल, असा अंदाज आहे. DRDO रुस्तम-2 एप्रिल महिन्यात 27 हजार फूट उड्डाण करेल त्यासाठी त्याला 18 तास लागतील. ‘रुस्तम-2’ ला तापस-बीएचही म्हटले जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात यशस्वीरित्या 16 हजार फूट उंच उड्डाण केले होते. DRDO ने हे ड्रोन अचूक निशाणा आणि शत्रूंच्या ठिकाणं भेदण्यासाठी बनवले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रीत केले असून, त्यानुसार स्वदेशी युद्धक टँक अर्जुन मार्क 1 A हे लष्कराकडे सोपविले.

भारत सैन्यावर सर्वाधिक खर्च करणारा देश
अमेरिका आणि चीन या दोन्ही देशानंतर भारत असा तिसरा देश आहे, की तो सर्वाधिक खर्च सैन्यावर करत आहे. मात्र, ड्रोनमध्ये भारत पिछाडीवर होता. तर चीन ड्रोन बनवण्यामध्ये सर्वात पुढे आहे. भारताला अमेरिका आणि इस्त्रायल या देशांकडून जास्त किमतीत इम्पोर्ट करावे लागत होते.