भारताचा मोठा निर्णय ; पाकिस्तानला जाणाऱ्या ‘त्या’ तीन नद्यांचे पाणी अडविले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी रोखणार असल्याचे जाहिर केले होते. अखेर एक महिन्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी रोखले असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आज (रविवार) सांगितले. राजस्थानच्या बिकानेर येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जैश ए मोहम्मदने पुलवामातील अवंतीपुरा येथे केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. केंद्रीय जल संसाधन राज्यमंत्री मेघवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘पूर्वेकडून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या तीन नद्यांचे ०.५३ मिलियन एकर क्षेत्राचे पाणी रोखण्यात आले आहे. हे पाणी रोखून साठवून ठेवण्यात आले आहे. ज्या वेळी राजस्थान किंवा पंजाबला पाण्याची आवश्यकता पडेल तेव्हा या पाण्याचा पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर करता येणार आहे.’

तसेच १९६० मध्ये करण्यात आलेल्या सिंधू जल कराराचे हे उल्लंघन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या करारामुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या सतलज, रावी आणि व्यास नदीचे सर्वाधिक पाणी वापरण्याचा अधिकार भारताकडे आहे आणि त्याच करारानुसार हे पाणी रोखण्यात आले आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

नैरोबीत विमान दुर्घटनेत १५७ लोक दगावल्याची भिती

रामदास आठवलेंच्या अडचणीत वाढ ; दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात ; राज ठाकरे सुपारी घेऊन भाषणे करतात आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री हे वाचा सविस्तर

चक्क पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्याचा खेळ पहा व्हायरल झालेला व्हिडीओ आणि वाचा सविस्तर

खूप झाले, आता सहन करणार नाही, नरेंद्र मोदींचा इशारा