Air strike नंतर आता Army strike, पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात मंगळवारी अतिरेक्यांचे तळ उध्वस्त झाले . त्यानंतर आता जम्मू – काश्मीरमधील भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपीयाना यथे पहाटे दहशतवादी आणि लष्कर यांच्यात बराच वेळ चकमक सुरु होती. या चकमकीत भारतीय सैनिकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

दरम्यान मंगळवारी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तान आर्मी कडून LOC जवळ गोळीबार करण्यात आला. जम्मू काश्मिरीरमधील शोपियान मध्ये पाकिस्तान आर्मी कडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भारताने पाकच्या ५ चौक्या उध्वस्त केल्या. तसेच पाकिस्तानचे काही सैनिक देखील मारले गेल्याची माहिती आहे. सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

https://twitter.com/ANI/status/1100597657616175104
३५० दहशतवाद्यांचा खात्मा – दरम्यान पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर देत भारतीय वायुसेनेने चोख प्रत्यत्तर देत अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले. वायुसेनेने  केलेल्या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा 3 हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला. भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा  हल्ला केला आहे. भारतीय हवाई दलाने १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन खोलवर सर्वप्रथम कारवाई केली. ही कारवाई सुरु असतानाच पहाटे पावणे चार वाजता काही विमानांनी मुजफ्फराबाद येथील तळावर हल्ला केला. जवळपास ८ मिनिटे हा हल्ला सुरु होता. त्याचवेळी चकोटी येथे ३ वाजून ५६ मिनिटांनी हल्ला केला. भारतीय विमानांनी तब्बल ९ मिनिटे जोरदार बॉम्बफेक करुन येथील तळ उद्धस्त केले.एवढा शक्तीशाली बॉम्ब टाकल्यानंतर तेथील धुरांचे डोंगर उसळले होते. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात ३५० दहशतवादी ठार, ३२५ अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे २५ प्रशिक्षक अशा एकूण ३५० जणांचा खात्मा, जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा…