लडाख सीमेवरील 6 प्रमुख शिखरांवर भारताचा ताबा !

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सहा नव्या प्रमुख शिखरांवर ताबा मिळवला आहे.29 ऑगस्ट ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या दरम्यान मगर, गुरुंग, रेचेन ला, रेझांग ला, मोखपरी आणि फिंगर 4 जवळील एका महत्त्वाच्या शिखरासह सहा नवीन शिखरे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी दिली आहे.

चिनी सैन्यासमोरच भारतीय लष्कराने शिखरांवर ताबा मिळवला. आता त्या भागात भारतीय सैन्य चिनी सैन्यावर नजर ठेवून आहे. शिखरांवर कब्जा करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील काठापासून दक्षिणेकडील काठापर्यंत तीनदा हवेत गोळ्या चालविल्या आहेत.‘ब्लॅक टॉप’ आणि ‘हेल्मेट टॉप’ ही शिखरे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूला आहेत, भारताने ताबा मिळवलेली शिखरे नियंत्रण असलेल्या भागात आहेत. भारतीय लष्कराने सहा शिखरे ताब्यात घेतल्यानंतर, चिनी सैन्याने रेझांग ला आणि रेचेन ला शिखरांजवळच्या भागांत सुमारे 3 हजार शस्त्रसज्ज सैनिकांना तैनात केले आहे.