Ind vs Aus : खराब बॅटिंगसह ‘या’ 5 मोठ्या कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध टेस्ट सीरीजमध्ये भारतीय टीमची सुरूवात अतिशय खराब प्रकारे झाली. अ‍ॅडलेड (Adelaide) मध्ये झालेल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने केवळ अडीच दिवसातच सरेंडर केले. मॅचच्या तिसर्‍या दिवशी भारतीय टीमने 88 वर्षांच्या आपल्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी केली आणि संपूर्ण टीम दुसर्‍या डावात अवघ्या 36 धावांमध्ये गुडाळली गेली. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या दुसर्‍या सत्रात केवळ 2 विकेट गमावून अगदी सहज 90 धावांचे लक्ष्य गाठले. यासोबतच ऑस्ट्रेलियाला सीरीजमध्ये 1-0 ने वाढ मिळाली. टीम इंडियाच्या या पराभवात खराब बॅटिंगशिवाय आणखीही काही मोठी कारणे जबाबदार ठरली.

अ‍ॅडलेडमध्ये डे-नाईट टेस्टमध्ये दोन दिवस टीम इंडियाचा दबदबा होता. टीमने जरी पहिल्या डावात मोठा स्कोअर केला नाही, तरी गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. यानंतर अपेक्षा होती की, भारतीय टीम दुसर्‍या डावात चांगल्या बॅटींगद्वारे ऑस्ट्रेलियाच्या समोर मोठे लक्ष्य ठेवेल, परंतु 19 डिसेंबरला मॅचच्या तिसर्‍या दिवशी जे झाले, त्यास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रयत्न केले तरी विसरता येणार नाही. टीमच्या पराभवाच्या 5 मोठ्या कारणांवर एक नजर टाकूयात –

1 खराब ओपनिंग, शॉ-मयंक फेल
ही टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त चर्चा या मुद्द्यावर होती की मयंक अग्रवालसोबत आपेनिंग कोण करणार. खराब फॉर्म असतानाही पृथ्वी शॉला संधी दिली गेली, ज्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दुर्दैवाने पृथ्वी शॉ टीकाकारांना चुकीचे ठरवू शकला नाही आणि दोन्ही डावात खराब टेक्नीकच्या कारणाने बोल्ड झाला, ज्यामुळे सुरूवातीलच टीमवर दबाव आला. शॉ मॅचमध्ये केवळ 4 धावा बनवू शकला. दुसरा ओपनर म्हणून मयंक अग्रवाल सुद्धा चांगली कामगिरी करू शकला नाही.

2 कोहलीचे रन आऊट भारी पडले
पहिल्या डावात भारतीय टीम खराब सुरूवातीनंतर चांगल्या स्थितीत दिसत होती, कारण कर्णधार विराट कोहली क्रीजवर पाय रोऊन होता. आणि चांगली फलंदाजी करत होता. कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसोबत चांगली भागीदारी केली आणि आपले 23वे अर्धशतक सुद्धा केले. यावेळी जेव्हा टीम चांगल्या स्थितीत असल्यासारखी वाटत होती, तेव्हाच अजिंक्य रहाणेच्या एका चुकीमुळे कोहली रन आऊट झाला. याचा मोठी परिणाम टीमवर झाला.

3 दिग्गज फलंदाज सुद्धा रोखू शकले नाहीत गळती
नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह आऊट झाल्यानंतर टीमला आपल्या दिग्गज फलंदाजांकडून अपेक्षा होती, परंतु एकाच ओव्हरमध्ये मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे खाते न उघडताच आऊट झाले, यामुळे भारतीय टीम अडचणीत सापडणे जवळपास निश्चित होते. कर्णधार कोहली सुद्धा यावेळी गळती रोखू शकला नाही आणि तो सुद्धा याचा भाग बनला. टीमने केवळ 4 धावांवर 5 विकेट गमावल्या, ज्यावरून टीमची खराब बॅटिंग दिसून येते. लोअर ऑर्डरमध्ये हनुमा विहारी आणि ऋद्धिमान साहाची कथा सुद्धा अशची ठरली आणि पहिल्या डावाप्रमाणे दुसरा डावात सुद्धा दोघे फेलच ठरले.

4 फील्डिंगमध्ये सुधारणा नाही
भारतीय टीमचा हा ऑस्ट्रेलिया दौरा निकालाच्या दृष्टीने कसाही असला तरी, टीमच्या फील्डिंगच्या दृष्टीने अतिशय कमजोर ठरला. वनडे आणि टी20 च्या नंतर टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा टीमच्या फील्डिंगमध्ये कोणतीही सुधारणा दिसली नाही.

5 टेल एंडर्सची पुन्हा समस्या
पहिल्या डावात भारतीय टीमची गोलंदाजी चांगली होती. टीमने स्टीव स्मिथला केवळ 1 रनवर रोखले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला डावात 191 धावांवरच गुंडाळले. ऑस्ट्रेलियन टीम येथपर्यंत सुद्धा पोहचू शकली नसती, जर टीम इंडियाची जुनी कमजोरी पुन्हा एकदा समोर आली नसती. पुन्हा एकदा टेल-एंडर्सला तोंड देण्यात भारतीय टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.