ICC World Cup 2019 : इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया ४ ‘विकेट किपर्सं’ना घेवून खेळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध होत असणाऱ्या सामन्यात भारताने बांग्लादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दोन प्रमुख बदल केले आहेत. कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वरकुमार आणि केदार जाधवच्या जागी दिनेश कार्तिक या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.

बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात एक नवीनच गोष्ट दिसून आली आहे. ती म्हणजे संघात चार विकेटकिपर खेळत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात ४ विकेटकिपर खेळत असल्याची ही पहिलीच घटना असेल. बांगलादेशविरुद्ध मैदानात महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, लोकेश राहुल हे चार विकेटकीपर खेळत आहेत. यामध्ये लोकेश राहुल फक्त पार्ट टाइम विकेटकिपिंग करतो. चला जाणून घेऊ या चार विकेट किपरविषयी.

१ महेंद्रसिंग धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने ३४७ एकदिवसीय सामन्यात १०६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. धोनीने आतापर्यंत ३१६ झेल पकडले आहेत तर १२२ स्टंपिंग केले आहेत.

२ दिनेश कार्तिक –
कार्तिकच्या नावावर ६१ झेल आणि ७ स्टंपिंग आहेत. कार्तिकने ९१ वनडे सामन्यात १७३८ धावा केल्या आहेत. आतापर्यंत कार्तिकेने ९ अर्धशतक केले आहेत.

३ ऋषभ पंत –
डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या पंतने ७ एकदिवसीय सामन्यात १७३ धावा बनवल्या आहेत. सर्वोच्च धावा ४८ आहेत. आतापर्यंत ऋषभने ६ झेल पकडले आहेत.

४ लोकेश राहुल –
२१ सामन्यात ५९२ धावा. सर्वोच्च धावसंख्या १००. राहुलच्या नावावर एक शतक आणि ४ अर्धशतक आहेत. त्याने ८ झेल पकडले आहेत.

केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ‘तुळस’ आहे उपयुक्त

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन