विश्वचषकातील कालच्या विजयानंतर जीवा धोनीने शेअर केली पप्पांसाठी खास ‘POST’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच विश्वचषक २०१९ ला सुरुवात झाली आहे. कालच भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना पार पडला. सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय टीमचे कौतुक होत आहे. अशातच एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवा हिचा हा फोटो. इंस्टावरून हा फोटो शेअर करण्यात आला असून सध्या तो व्हायरल होताना दिसत आहे.

जीवा धोनीच्या नावाने इंस्टावर अकाऊंट आहे त्यावरून जीवाचा हा फोटो शेअर होताना दिसत. भारताने मिळवलेल्या विजयानंतर आपले वडिल महेंद्रसिंग धोनीचं कौतुक करत जीवाने हा फोटो शेअर केला आहे. जीवा या फोटोत पाऊट करत पप्पी देताना दिसत आहे. या फोटोला जीवाने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये जीवा म्हणते की, “A pappi for my pappa We won” सध्या जीवाचा हा फोटो प्रचंड व्हायर होताना दिसत आहे. जीवा याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे.

कालच भारताच्या मिशन वर्ल्डकप 2019 ला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना पार पडला. सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. वर्ल्डकपची सुरुवात भारताने विजय मिळवत केली आहे. या विजयात रोहित शर्माने शानदार खेळी केल्याचे दिसून आले. 230 धावांपैकी निम्म्याहून अधिक धावा त्याने केल्या आहेत. रोहितचे हे विश्वचषकातील दुसरे शतक आहे. यापूर्वीही त्याने 2015 साली शतक झळकावले होते.