Indian Army Recruitment Rally-2021 | 8 वी, 10 वी व 12 उत्तीर्ण तरुणांना भारतीय लष्करात नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Army Recruitment Rally-2021 | भारतीय लष्कराने 8वी, 10 वी आणि 12 उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय लष्करातील शिपाई पदांसाठी (Indian Army Recruitment Rally-2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरु झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट असून अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या लष्कराच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

लष्कराने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, शिपाई ट्रेडमॅन पदासाठी (Tradesman Post) भरती रॅली हिमाचल प्रदेशातील पृथ्वी मिलिट्री स्टेशन, एव्हरीपट्टी रामपूर बुशर, शिमला येथे 2 मार्च 2022 पर्यंत अपेक्षित आहे. तर शिपाई डी फार्मा पदासाठी 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2021 या काळात हिमाचल प्रदेशातील कुल्लू, लहौल स्पिती, मंडी येथे भरती होणार आहे.

या पदासाठी भरती

शिपाई जनरल ड्युटी, शिपाई लिपिक, शिपाई ट्रेडमॅन (8 वी पास), शिपाई ट्रेडमॅन (10 वी पास) आणि शिपाई (फार्मा) या पदांच्या भरतीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता

शिपाई (फार्मा) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डी फार्माची (D Pharmacy) पदवी असली पाहिजे. तर शिपाई जनरल ड्युटीसाठी उमेदवार 45 टक्के गुणांसह 10 वी पास असणे आवश्यक आहे. शिपाई लिपिक पदासाठी 60 टक्के गुणांसह 12 वी पास असणे गरजेचे आहे. शिपाई ट्रेड्समॅनचा उमेदवार 8 वी पास असला पाहिजे.

वयोमर्यादा

शिपाई जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 2000 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असावी. शिपाई (फार्मा) या पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान असावी. इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.

अशी होईल निवड

या पदांसाठीच्या रॅलीदरम्यान उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या,
शारीरिक मोजमाप आणि वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतील.
या सर्व यशस्वी उमेदवारांची सामान्य प्रवेश परीक्षेसाठी निवड केली जाईल.
सामान्य प्रवेश परीक्षेत यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

Web Title : indian army recruitment rally 2021 8th 10th 12th passed know here full details
about army bharti know salary and all thing 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक