हरभजन सिंगवर भडकले चाहते, म्हणाले – ‘भारताचं नाव बदनाम करू नकोस’ ! मागावी लागली जाहीर माफी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सोशल मीडियावरील आपल्याच एक पोस्टमुळं भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Turbanator) याच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे. एका पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यावर, भारताचं नाव बदनाम करू नकोस अशी टीका केल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे.

नेमकं काय घडलं ?
हरभजननं अलीकडेच ट्विट केलं होतं. यात त्यानं हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की, भारताचे अधिकारी कोरोना लस घेत नाहीत तर आपण लस घेतली असं दाखवण्याचं नाटक करत आहेत. कोरोना लसी सोबत आपला फोटो तर ते काढतात परंतु प्रत्यक्षात मात्र लस घेत नाहीत.

हरभजनचं हे ट्विट समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं. एका चाहत्यानं त्याला म्हटलं की, तू भारताचा सेलिब्रिटी म्हणून सर्वत्र मिरवत असतो. परंतु भारता बद्दल तुला अभिमान आहे की नाही. कोरोनाची लस ही कोणत्या एका पक्षासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आहे. एकानं तर असंही म्हटलं की, तू ट्विट डिलीट करून चालणार नाही, सर्वांची माफीही मागायला हवीस. ट्रोल झाल्यानंतर हरभजन सिंगनं त्याची चूक लक्षात घेत माफी मागितली. आपल्या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं की, मी सत्यता पडताळून न पाहता ट्विट केलं होतं, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो.