दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ जाहीर, ‘या’ खेळाडूला डच्चू तर टीममध्ये 2 नवीन चेहरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर असणारा भारतीय क्रिकेट संघ दोन दिवसात मायदेशी परतणार आहे. 15 सप्टेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. आधी टी-20 आणि नंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये धक्कादायक बदल करण्यात आले आहे.

भारतीय संघाने आज जाहीर केलेल्या आपल्या संघातून लोकेश राहूलला वगळण्यात आले आहे. सातत्याने अपयशी ठरल्याने लोकेशला वगळ्यात आले आहे. त्याच्याजागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. तसेच शुभमन गिललासुद्धा या संघात स्थान देण्यात आले आहे. भारताच्या गोलंदाजीची धुरा जसप्रितबुमरा, ईशांत शर्मा, महंमद शमी, आर आश्विन आणि कुलदीप यादव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दोन टप्प्यात दौरा
हा दौरा दोन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्यकी तीन टी-20 आणि कसोटी सामने होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात तीन वन-डे होणार आहेत.

टी-20 सामन्याचे वेळापत्रक
पहिला सामना – 15 सप्टेंबर – धरमशाला,
दुसरा सामना – 18 सप्टेंबर – मोहाली
तिसरा सामना – 22 सप्टेंबर – बेंगळुरू

कसोटी सामन्याचे वेळापत्रक
पहिली लढत – 2 ते 6 ऑक्टोबर – विशाखापट्टणम
दुसरी लढत – 10 ते 14 ऑक्टोबर – पुणे
तिसरी लढत – 19 ते 23 ऑक्टोबर – रांची

वन -डे सामन्याचे वेळापत्रक
पहिला सामना – 12 मार्च 2020 – धरमशाला
दुसरा सामना – 15 मार्च 2020 – लखनौ
तिसरा सामना – 18 मार्च 2020 – कोलकत्ता

कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ
विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), हनुमा विहारी, वृषभ पंत (विकेटकीपर), वृध्दिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल

You might also like