Indian E-Passports | भारतीय नागरिकांना मिळणार E-Passports ! जाणून घ्या काय आहे हे आणि कसे करणार काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian E-Passports | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत 2022-23 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला, ज्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली की, लवकरच भारतातील नागरिकांना परदेशात जाण्यासाठी ई-पासपोर्टही (Indian E-Passports) उपलब्ध करून दिला जाईल.

 

भारतीय नागरिकांना मिळणार E-Passport
सामान्य पासपोर्ट प्रमाणेच काम करण्यासाठी, भारतीय नागरिकांना या वर्षी ई-पासपोर्ट जारी केले जातील जे एम्बेडेड चिप्स आणि फ्यूचरिस्टिक टेक्नॉलॉजीसह येतील. या ई-पासपोर्टमध्ये मायक्रोचिप बसवलेली असेल ज्यामध्ये आवश्यक सुरक्षा डेटा स्टोअर केला जाईल. सध्या भारत नागरिकांना फक्त छापील पासपोर्ट देतो. (Indian E-Passports)

 

काय आहे ई-पासपोर्ट (What is E-Passport)
ई-पासपोर्ट हे सामान्य मुद्रित पासपोर्टपेक्षा फारसे वेगळे नसतात, केवळ सामान्य पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित असतात. ई-पासपोर्ट सर्व माहिती एका चिपमध्ये ठेवेल जी सामान्य पासपोर्टमध्ये छापली जाते, जसे की तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमची जन्मतारीख इ.

ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये (Features of E-Passport)
ई-पासपोर्टच्या वैशिष्ट्यांसह सांगायचे तर, या पासपोर्टमध्ये बसवलेल्या चिपमध्ये व्यक्तीची सर्व माहिती संग्रहित केली जाईल.
हा ई-पासपोर्ट 64 केबी स्टोरेज स्पेस आणि रेक्टँग्युलर अँटेनासह येईल जो पासपोर्टमध्येच एम्बेड असेल. ही चिप पासपोर्टच्या मागील बाजूस बसवली जाईल.

 

सुरुवातीला, या चिपमध्ये पासपोर्टधारकाच्या पहिल्या 30 आंतरराष्ट्रीय प्रवासांची सर्व माहिती असेल
आणि नंतर या पासपोर्टमध्ये धारकाचा फोटो आणि त्याची बायोमेट्रिक माहिती देखील असेल.

 

ई-पासपोर्ट जगातील 120 देशांमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये जर्मनी (Germany), यूके (UK) आणि अमेरिका (America) यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Indian E-Passports | union budget 2022 to be issued epassports for more comfortable travel know what are they and how are they used

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

 

SBI Online Transaction | ‘एसबीआय’ बँकेने केला मोठा बदल ! ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, जाणून घ्या

 

IT Raid On Retired IPS Officer | बेसमेंट, 650 लॉकर आणि कोट्यवधी रुपये ! वाचा माजी IPS च्या घरावरील छापेमारीची संपूर्ण माहिती