#Surgicalstrike2 : पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट, जाहिरातींना बंदी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्टाईकनंतर आता पाकिस्तानने काही तरी कारवाई केली हे दाखविण्यासाठी भारतीय चित्रपट व जाहिरातींवर बंदी घातली आहे. पाकिस्तान सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशनच्या वतीने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे, असे माहिती पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी जाहीर केले आहे.

पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट, टीव्ही वरील मालिका खूप लोकप्रिय आहेत. बेकायदेशीरपणे तेथे भारतीय चित्रपट पाहिले जातात. भारतीय टीव्ही वाहिन्यांवरील मालिकाही मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय दिग्दर्शकांनी पाकिस्तानात चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा येथील हल्ल्यानंतर एकही हिंदी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झालेले नाही. पुढील महिन्याभरात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपट निर्मात्यांनी स्वत:च पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पाकिस्तान एक्झिबिटर्स असोशिएशनने घेतलेल्या या निर्णयाचा भारताला फारसा काही तोटा होण्याची शक्यता नाही. उलट तेथील चित्रपटगृह चालक व वितरकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.