उद्या डॉक्टरांचा देशव्यापी संप, रूग्णसेवा पूर्णपणे कोलमडणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सादर करण्यात आले होते. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे उद्या देशातील रुग्णसेवा बंद राहणार आहे.

केंद्र सरकारकडून ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय)च्या जागेवर नवीन आयोग स्थापन करण्याचे योजले जात आहे. नवीन आयोगाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करणारे हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि ते मंजूरही झाले. मात्र याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या या निर्णयावर विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील डॉक्टरांना संपाची हाक दिली आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशने पुकारलेला हा संप २४ तासांचा असणार आहे. डॉक्टरांच्या संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे उद्या दिवसभरात देशभरातली रुग्णसेवा कोलमडू शकते. त्यामुळे रुग्णांचे उद्या डॉक्टरांअभावी त्रास सहन करावा लागू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –