भारतीय लोक दर ४ ते ६ मिनिटांनी मोबाईल पाहतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या म्हणजेच ५०० कोटींपेक्षा जास्त मोबाइल वापरते. यात १०० कोटींवर तर एकट्या भारतात आहे. स्मार्टफोन युजर्सची संख्या मात्र कमी आहे. संशोधन करणा-या ई-मार्केटनुसार, वर्षाच्या शेवटी स्मार्टफोन युजर्सची संख्या ३३.७ कोटी असेल. यात वार्षिक सरासरी १६ टक्के म्हणजे सर्वाधिक वाढ होत आहे. इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्सच्या अहवालानुसार, तरुण रोज ६ तासांपर्यंत फोन वापरतात.

मोबाईल फोनच्या आहारी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून देशातील ४० टक्के स्मार्टफोन युजर्स दररोज २ ते ६ तास मोबाईलवर वेळ घालवत असतात. सरासरी प्रत्येक जण दिवसभरात १५० वेळा फोन चेक करीत असतात. म्हणजेच ६ मिनिटांनी एकदा असे आयसीएसएसआरच्या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ac829cb-c08f-11e8-9673-7f57f78684f7′]

महिला स्मार्टफोन युजर २९ टक्के कमी, पण फोनला सरासरी १४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देतात. त्या ८० टक्के वेळ फक्त सोशल साइट्सवर, यू-ट्यूबवर देतात हे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे.  तर, ७८ टक्के किशोरवयीन ४ तास फोनवर असतात. १४ टक्के जणांना डोकेदुखी, निद्रानाश, चक्कर येण्याची समस्या जाणवतात.

तुम्ही फोनच्या आहारी गेलात हे कसे कळते

६७ टक्के स्मार्टफोन युजर घंटी वाजली नाही, मेसेज किंवा नोटिफिकेशन आले नाही तरी फोन पाहतात.
एखादी चिंता सतावत असली तरी फोनचा वापर सुरू करतात.
नेटवर्क नसल्यास राग, चिंता, चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढते.

[amazon_link asins=’B079NBHCKM,B07BCCFBKZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b7e36be-c092-11e8-bdc6-534e54d09d7e’]

यातून कशी सुटका करुन घ्याल

पुश नोटिफिकेशन आॅफ ठेवा : केवळ आवश्यक अ‍ॅपचे नोटिफिकेशन आॅन ठेवायला हवेत. त्यामुळे आॅनलाइन व्यग्रता ६० टक्के घटणार.
अलार्म घड्याळ विकत घ्या: फोनचा अलार्मसाठी वापर नको. झोपताना फोन जवळ बाळगू नका. ४३ टक्के लोक उठताच १२ मिनिटांपर्यंत फोन पाहतात.
होम स्क्रीनवर कामाचे अ‍ॅप : फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखे अ‍ॅप होम स्क्रीनवर ठेवू नयेत. सोशल मीडिया व्यग्रता २०टक्के पर्यंत कमी होणार.
वेळापत्रक बनवा : काही दिवस १५ मिनिटे, नंतर ३० मिनिटांनंतर फोन चेक करणे सुरू करा. तर ७३ टक्के लोक याच्या आहारी जाणार नाहीत.

[amazon_link asins=’B071JWBFDT,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’054b8932-c090-11e8-b45d-0fae253dcfeb’]