नौकानयनात भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड 

पालेमबांग : वृत्तसंस्था 
आशियाई क्रीडा  स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी  वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं.दत्तू भोकनळ , ओम प्रकाश, स्वर्ण सिंह, सुखमीत सिंह यांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे या संघात महाराष्ट्राचा दत्तू भोकनळचा समावेश आहे. भारताने आज नवकनायनात तिहेरी धमाका  केला.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71200845-a75a-11e8-a687-15cdfb23eaf1′]

पहिल्यांदा दुष्यंतने लाईटवेट रोईंग प्रकारात कास्य जिंकले काही वेळात दुहेरी भगवान सिंग आणि रोहित कुमार यांनी कास्य जिंकले. यानंतर सांघिक प्रकारात भारताने सुवर्ण पदक जिंकून भारताची पदक तालिकेतील सुवर्ण संख्या ५ वर नेली.

आशियाई स्पर्धेच्या ६ व्या दिवशी भारत पदकतालिकेत १० व्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात ५ सुवर्ण, ४ रौप्य, आणि १२ कास्य पदक अशी एकूण २१ पदके आली आहेत.